Posts

Showing posts from December, 2021

चंपाषष्ठी : मल्हारी मार्तंड

Image
  चंपाषष्ठी : मल्हारी मार्तंड अलोक पवार आयुष्य हे प्रॅक्टिकली जगावे हे हिंदू संस्कृतीमध्ये खूप खचून खचून सांगितले गेले आहे. सुरवात अगदी देवाधिकांच्या पासूनच आहे. म्हणजे आत्ता थेट प्रकट होऊन कोणताच देव किंवा देवी वरदान देत नाही. पण आधीच्या युगांमध्ये हे प्रमाण खूप होत, म्हणजे एक देव किंवा देवीने वर द्यायचा अगदी अमरत्वाचा किंवा तुझा वध कोण करू शकत नाही वगैरे वगैरे आणि मग दुसऱ्या  देवाला किंवा देवीला हे सर्व वर प्रकरण निस्तरावे लागायचे. यातलीच एक भावांची जोडी म्हणजे मणी आणि मल्ल.  दोघा भावंडाना ब्रम्हदेवाचे वरदान प्राप्त झाले होते आणि हे वरदान साधेसुधे नसून थेट अमरत्वाचे होते. मणी आणि मल्ल दोघा भावंडांनी आपल्या वरदानाचा दुरुपयोग करायला सुरुवात केली होती. त्यांनी अगदी देवांचा राजा इंद्र याला सुद्धा सोडले नाही. इंद्राला राजा म्हणून कुठे एकट्याने युद्ध जिंकले तेंव्हा मणी आणि मल्लाची बाजी तो जिंकणार. यावेळी पण संपूर्ण इंद्र दरबार विष्णू कडे गेले. भगवान विष्णूने असमर्थता दाखविल्यावर ही सर्व मंडळी शंकराकडे गेली. यावेळी शंकराने ' खंडोबा ' चे रूप धारण केले.  खंडोबा हा शंकराचे र...