स्कंदमाता : आई जननी
स्कंदमाता : आई जननी अलोक पवार एकदंरीतच आईला जगामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वक्षेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येक स्त्रीला मूल झाले की तिला सर्वस्व येते असे म्हणतात. देवी पार्वती जरी जगाची माता झाली ना तरी तिला मुलांची आवड ही तिच्या संपूर्ण जीवनावरून दिसून येतात. जेंव्हा महादेवाने जगाची काळजी घेण्यासाठी आपल्या पुत्राला जवाबदारी दिली तेंव्हा पार्वतीने तिच्याकडेच तिच्यासाठी म्हणूनच एका पुत्राची निर्मिती केली. त्याच गणेशाला आराध्य बनविण्यासाठी पार्वतीने केलेला आटापिटा पण सर्वांना माहिती आहे. पण ही स्कंदमातेची कहाणी गणेशाच्या जन्माच्या आधीची. स्कंद कुमार म्हणजेच कार्तिकेय. सहा मुखी कार्तिकेय हा माता पार्वती आणि भगवान महादेव यांचे पुत्र. स्कंद कुमार यांनी देवीला आई बनण्याचे सुख प्रदान केले आणि म्हणूनच पार्वती झाली स्कंदमाता. आई नक्की काय असते, आपल्या लेकरासाठी ती किती झटते, त्याला वाढविण्यासाठी ती किती कष्ट घेते याचे ही आदिमाता स्कंदमाता जगासमोर आई म्हणून मांडणी करणारी पहिली स्त्री. एकंदरीतच मातृत्व असणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारी ओळख म्हणजे स्कंदमाता. मातृत्वामध्ये एक आपल्यासारखा नाकी ...