पर्युषण पर्व
पर्युषण पर्व अलोक अर्जुन अलका पवार जैन धर्मातील एक महत्वाचा कालावधी म्हणजे पर्युषण पर्व. हिंदू धर्मातील गणेशोत्सवासोबत चालू झालेला काळ म्हणजे पर्युषण पर्व. जैन धर्म 'अहिंसा परमो धर्म' या धर्तीवर उदयास आला आहे. याचीच शिकवण प्रत्येक जैन बांधवांमध्ये रुजू व्हावी म्हणून बरेच जैन साधू आणि साध्वी संपूर्ण वर्षभर प्रयत्न करतात. पावसाळा सोडला तर ते अगदी एका ठिकाणाहून दुसरीकडे अनवाणी चालत जातात. पावसाळ्यात नवीन जीवांची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या पायाखाली चुकूनही कोणत्या जीवाला हानी पोहोचू नये या यामागचा पवित्र उद्देश. जैन साधू आणि साध्वी धर्मातील शिकवण आणि समाज प्रबोधन अगदी उत्तम रित्या पार पाडतात. चातुर्मास म्हणजेच पावसाळ्यातील चार महीने. मग त्या दिवसांत एकाच जागी बसून देखील कर्तव्य पालन करता येतील म्हणून एक जागी मुक्काम करून धर्माची साधना करण्याचे पावसाळ्यातील हे चातुर्मासाचे हे दिवस. या दिवसांतील एक पर्वणी म्हणजे पर्युषण पर्व. वर्षभरातील आपल्या कामाच्या व्यापाने आपल्याला जर धर्माचे अनुपालन करता आले नसेल तर सामान्य जैन नागरिक या पर्युषण पर्वात ही सर्व जबाबदारी पार पाडू शकतो. म...