काळभैरव जयंतीनिमित्त
काळभैरव जयंतीनिमित्त अलोक पवार साधारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये काळभैरवाचे मंदिर असते. अगदी घरात म्हणले तरी हा काळभैरव प्रत्येक हिंदू माणसांच्या घरात देखील कुलदैवत म्हणून विराजमान दिसतो. कालभैरव बऱ्याचदा मंदिरांमध्ये रूढी परंपरा यांच्या मध्ये घट्ट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वी स्त्रिया आणि मंदिरप्रवेश या विषयावर महाराष्ट्रात आणि केरळमध्ये पण बराच तांडव झाला, वाद झाला. या लढाई मध्ये कोण हरल कोण जिंकलं हे पाहण्यापेक्षा आपण सत्य शोधलं पाहिजे आणि त्याला अनुसरून आपले आचरण केले पाहिजे. सर्वात पहिले आपण या देवाच्या उत्पत्तीच्या काही गोष्टीं समजून घेऊ. एकदा ब्रम्हा विष्णू आणि महेश म्हणजेच भोलानाथ शंकर यांच्यामध्ये वाद झाला, विषय होता तिघांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? देवांमध्ये असा वाद होणे म्हणजे थोडे आश्चर्यच नाही. तिघांचे स्थान तसे आपल्या जागेवर इतके मोठे होते की त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नव्हते. एक निर्मिती करणारा होता, एक पालन करणारा होता तर एक मोक्ष देणारा होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की भगवान शंकराला प्रचंड राग आला आणि त्यांनी रुद्राक्षातून काळभैरवाची निर्मिती क...