Posts

Showing posts from August, 2021

कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड

Image
कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड अलोक पवार प्रचंड पूर आला होता, आता पूर आला होता की आणला गेला होता म्हणजे ईश्वरी लीला वगैरे तो भाग विचार करण्या सारखा आहे. एखाद्या गोष्टी सोबत एखादी गोष्ट मोफत भेटली तर माणूस खूप खुश राहतो तसेच कदाचित एक आई- वडिलांसोबत अजून एक आई वडिलांचे प्रेम पाहिजे यासाठी हा सर्व थाट होता. कैद्यखान्याचे दरवाजे थेट उघडतात. आणि सुरू होते तात्पुरत्या सख्या आई वडिलांच्या सोबतची ताटातूट. आपले बालपण एका राक्षसी प्रवृत्ती पासून वाचविण्यासाठी ही एक शक्कल म्हणायला काही हरकत नव्हती. सहा मुल मारले गेले होते आत्तापर्यंत. बघा यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला आहे. कंसाला आपल्या बहिणीविषयी देवकीविषयी विशेष प्रेम होते. पण तिच्या लग्नाच्या रथात तिला बसवताना आकाशवाणी होते की त्याच बहिणीचा आठवा पुत्र तुझा काळ बनणार आहे तेंव्हा ते भगिनीप्रेम क्षणार्धात संपते. आणि सुरु होतात मुलांना मारण्याची कार्यक्रमाची सुरवात. कंस बहिणीला तेंव्हाच मारणार असतो पण वासुदेव स्पष्ट म्हणतात मी हिचे सर्व पुत्र तुला आणून देईल. जेंव्हा पहिला मुलगा झाल्यावर वासुदेव त्याला घेऊन कंसाकडे येतो तेंव्हा त...

नागपंचमी

Image
  नागपंचमी प्रा. पवार अलोक अर्जुन अलका हिंदू संस्कृतीला अनुसरून आपण देवतांना तर पूजतोच पण या देवतांमध्ये आपल्याला बरेचदा निसर्गातील काही ठळक ठराविक तरतुदी समोर येताना दिसतात. ज्यामध्ये शंकरासोबत नंदी, नाग, देवी सोबत सिंह, अगदी गणपती सोबत उंदीर दिसून येतो. निसर्गातील याच गोष्टींना मान देणे हे आपण या विविध सणांद्वारे शिकतो आणि शिकणेच अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीमागील शास्त्र समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. सर्व प्रथम आपण पारंपरिक पुराण काय सांगतात याकडे पाहू. गरुड पुराणानुसार, एका ब्राम्हणाला सात मुलं होती, सर्वांची लग्न झाली होती. श्रावण महिना आल्याने सात सुनांपैकी सहा सुना या माहेरी मार्गस्थ होतात. त्यांच्या कडे माहेरी जाण्याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यातील रक्षाबंधन. भावाला भेटण्याचा दिवस. उर्वरित सून खूप उदास होऊन देव्हाऱ्यात बघते आणि प्रार्थना करते मला भाऊ असता तर मी त्याला ओवाळले असते राखी बांधली असती. देव्हाऱ्यात असलेल्या शेषनागाला ही धाव ऐकू येताच तो त्वरित सरपटत त्या स्त्रीच्या घरी ब्राम्हण वेशात येतो आणि त्या स्त्रीला राखी बांधण्यास सांगतो. भावाच्या आशेने घरी आलेल्या ...