Posts

Showing posts from December, 2020

अनुसया पुत्र दत्तात्रय

Image
  अनुसया पुत्र दत्तात्रय प्रा. अलोक पवार आजचा दिवस सर्व लोक दत्तजयंती म्हणून साजरा करतोच मात्र या सर्वामंध्ये जर कथा विशेष बघितला तर आपण सपशेल अनुसया नामक देवीला विसरतो. स्त्रियांचा विसर, स्त्रियांनी केलेल्या त्यागाचा विसर पडणे ही नवीन गोष्ट नसली तरीही आपल्याकडील पुरातन गोष्टींमध्ये, पुराणात, लेखांत जे सीता, राधा, लक्ष्मी, पार्वती आधी स्त्री देवतांविषयी गोष्ट आहे ती आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे भक्ती करणे गरजेचे आहे. कारण सर्वांना दत्तात्रय माहिती आहे मात्र दत्तात्रय घडविणारी माता सर्व जण विसरले आहेत तर आठवणीत आणण्याचा आजचा दिवस दत्तजयंतीचा. महान ऋषी अत्रीमुनींची पत्नी अनुसया. अनुसया ही अतिशय पवित्र आणि पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती. आश्रमात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे त्या आदरातिथ्याने स्वागत करीत आणि त्यांच्या भोजनाची आणि संपूर्णच मानपानाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायच्या. या आश्रमात आलेला एकही पाहुणा तो जरी भिक्षुक असला तरीही अतृप्त होऊन परत जात नसे. अशा अनेक ऋषीमुनींचे, भिक्षुक्षांचे, पाहुण्यांचे आशीर्वाद अनुसयेला प्राप्त झालेले होते. तिच्या पतीव्रता धर्माबद्दलही ती प्रसिद्ध होती. ...

मार्गशीर्ष गुरुवार पुन्हा एकदा लक्ष्मीपूजन

Image
 मार्गशीर्ष गुरुवार पुन्हा एकदा लक्ष्मीपूजन दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन केले की पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी पूजनाला कथा आहे मात्र ती पूजा किंवा लक्ष्मी कथेचा सार आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी वापरायची हे त्या वाचकाला कळले पाहिजे.  गोष्टीची सुरवात ही आपल्याला द्वापार युगातल्या राजा राणीची गोष्ट सांगते. भद्रश्रवा आणि सुरातचंद्रिका हे राजा राणीचे कुटुंब. मागाच्या जन्मी कर्मदारिद्य लाभलेली राणी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करून यावेळी ती राणी झाली आहे मग तिने या जन्मी देखील लक्ष्मी ची पूजा केलीच पाहिजे हे सांगायला देवी वृद्ध महिलेचे रूप घेऊन राजदरबारात येते. हे ऐकून राणीच्या लेकीने म्हणजे श्यामबालेने आणि राणीने देखील लक्ष्मी पूजा व्रत केले. मात्र राणीने काहीच पूजा अर्चना न केल्याने तिला दारिद्र्य वास पुन्हा भोगावा लागला. राज्य गेले, दुसऱ्या देशाच्या हल्ल्यात राजा राणी देशोधडीला लागले. इकडे श्यामबाला मात्र धन्य झाली ती एका राजाची राणी झाली. तिचे सुख पाहून आणि तिची पूजा अर्चना पाहून राणीला मागच्या जन्मीच सर्व आठवल आणि आणि तिने मनोभावे पुन्हा पूजा सु...