भगवान महावीर जयंती
भगवान महावीर जयंती अलोक पवार महावीर चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करण्यासाठी नेहमीच विविध स्थानांवर जायचे. जाताना सोबत त्यांचे विद्यार्थी नेहमीच असायचे. विद्यार्थी महावीर यांच्याकडून काय काय शिकता येईल या गोष्टीचा नेहमी विचार करायाचे. तसे महावीरांचे सर्व विद्यार्थी, साधक हे त्यांच्याप्रती भरपूर प्रेम, आदर निष्ठा ठेवून वागायचे. पण त्यातील एक जण एके वेळी त्यांच्यावर नाराज होता. महावीर कसे चुकीचे असू शकतात, याची तो महावीरांकडून अशी काही कृती घडते का यांच्याकडे लक्ष ठेवून असायचा. एका दिवशी महावीर आणि त्यांचा तो विद्यार्थी दोघेही जंगलमार्गी एका सभेला निघाले. जंगलामधील एका रोपला बघून तो विद्यार्थी महावीरांना म्हणाला, "या रोपाला कधी भविष्यात फुले लागतील". महावीर यांनी आपले डोळे मिटले. थोडा गहिवर विचार करून पुन्हा डोळे उघडून महावीर म्हणाले, " येणार नक्की येणार". त्या शिष्याने कुच्छित वृत्तीने ते रोप उपटले आणि तेथे फेकले. आणि हसतंच म्हणाला, "महाराज मी हे रोप उपटले आता ह्याला कसे काय फुल लागणार". महाराज त्याच्या प्रवृत्ती कडे बघून काहीच न बोलता आपल्या पुढच्या...