गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची
गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची प्रा अलोक अर्जुन अलका पवार "बोल वत्सा, तुला काय वरदान हवे", आधीच्या काळी साधारण हे असे ब्रम्हवाक्य प्रसिद्ध होते. हिरण्यकश्यपूने ऊन, वारा, पाऊस सर्व त्रास झेलून शेवटी ब्रम्हदेवाला प्रसन्न केले होते. ब्रम्हदेव पण इतकी कडक तपश्चर्या बघून त्वरित हजर झाले होते. त्यावेळी फक्त तथास्तू हा एक शब्द बोलले म्हणजे झाले. मात्र त्यावेळी पुढे कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा नव्हती की पुढे काय करणार वरदान मिळाल्यावर, पुढचे थोडे फ्युचर प्लॅन सांगा वैगरे थेट तथास्तू. आणि मग याच तथास्तू च्या जोरावर पुढे जे काही होईल त्याला परत एक मोठा हंगामा अशी परिस्थिती. त्या काळी अगदी वरदान देताना लाभार्थी चे बॅकग्राऊंड तपासणे, कोणी रेफरन्स देत आहे का वरदान दिले की लाभार्थी कोणत्याही प्रकारे चुकीची कामे करणार नाही हे देखील काही नव्हते. या सर्व अद्ययावत मोहीमा फक्त कलयुगातच. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग सर्व युगात ही सर्व अंधाधुंदी म्हणायला काही हरकत नाही. बर कोणते वरदान होते याची यादी बघा. कोणत्याही मानवाच्या किंवा प्राण्यांच्या हाती मारला जाणार नाही. रात्र आणि...