बेंदूर... जिवा शिवाची माझी जोडी
बेंदूर ... जिवा शिवाची माझी जोडी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही भागात साजरा होणारा आजचा सण. आपला भारत हा कृषिप्रधान देश. महाराष्ट्राच्या मातीत देखील सोने पिकते. आता हे सोन पिकविण्यासाठी शेतकरी बांधवांचा मित्र म्हणजेच बैल. अजूनही बऱ्याच भागात बैल आणि बैलगाडीचा वापर करून शेती करतात. शेतकऱ्याच्या जोडीने तितक्याच कदापि जास्त ताकदीने बैल शेतात राबतो. आपल्या धन्याच्या जोडीने धान्य पिकवतो. आता बऱ्याच ठिकाणी बैलांच्या जागी नांगरणी, किंवा अन्य कामांसाठी टॅक्टर वापरला जातो मात्र तरीही बैलांचा वापर कमी झाला नाही. याच बैलांच्या मदतीचे उपकार त्यांच्याप्रती दाखविलेली कृतज्ञता म्हणजेच हा बेंदूर सण. भारतातील इतर राज्यातही हा सण साजरा केला जातो मात्र तिथीनुसार दिवस वेगळा पाहायला भेटतो. आपल्याकडे याला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीयन बेंदूर असे देखील म्हणतात. बेंदूर आणि पुढे श्रावण महिन्यात येणार बैलपोळा दोन्ही सण साजरा सारख्याच पद्धतीने साजरा केला जातो. बेंदूर आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. शेतात बैल राबतो, तो कष्ट करतो, त्याच्याविषयीची आपुलकीची भावना निर्माण होऊन आजच्या दिवस ...