Posts

तुळशीचे लग्न

 तुळशीचे लग्न डॉ. अलोक पवार आमच्या सणांना बऱ्याच लोकांनी नाव ठेवायला सुरवात केली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या फेऱ्यामध्ये गुरफटून हिंदू सण आले की त्यांना बऱ्याच अहिंदू लोकांकडून नावे ठेवली जातात. आमचे हिंदू सण हे बऱ्यापैकी पर्यावरणाच्या धर्तीवर असल्याने त्याच महत्व हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. मात्र येथील पूजा मांडणाऱ्या लोकांनी चुकीचे महत्व पसरविल्याने या सणांना नाव ठेवली जातात.  माझ्या एक मॅडम होत्या आमचे आम्हाला स्त्री अभ्यास ( Feminism) शिकवायच्या. त्यांनी शिकवता शिकवता तुळशीचा विषय काढला होता. त्यांचं म्हणणं होत काही हिंदू धर्मातील सासू सुनेला सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालायला लावतात. ती सून पाणी घालते, तुळशीला फेऱ्या मारते. त्या मॅडमच्या म्हणण्यानुसार ही परंपरा रीती रीवाज चुकीचा आहे. या मॅडमचे डोळे उघडवण्याची वेळ खरे तर तेंव्हापासून होती. मात्र त्यांच्या सोबत सर्वांना तुळशीचे आणि तिच्या लग्नाचे पण महत्व 

रक्षाबंधन

  रक्षाबंधन डॉ. अलोक पवार लहानपणी राखी बांधून घ्यायची म्हणजे अगदी उत्साह असायचा अजूनही हा उत्साह आहेच. म्हणजे माझ्या आवडीची राखीच पाहिजे. त्यावर अमुक तमुक कार्टून पाहिजे, गाडीची राखी पाहिजे, शक्तिमान ची, सुपर हिरोची राखी पाहिजे. म्हणजे त्या काळी रक्षाबंधन या दिवसाचे महत्व काय माहिती. मला पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे शक्यतो हिच भावना सर्व लहान भावंडात असतेच. आणि मुलांमध्ये बर भावना, मुली ही भावना जोपासू शकत नाहीच. कारण हे रक्षा सूत फक्त आणि फक्त भावाच्या मनगटावर बांधले जाते.  असो आजच्या लेखात मी धार्मिक, ऐतिहासिक आणि अलोक - स्टाईल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. जर धार्मिक गोष्टी बघायला गेलो तर इंद्राच्या बायकोला 'शूचीला' विष्णुकडून एक धागा मिळालेला. हा विष्णू म्हणजे तोच जो कधी कठोर रामाचा अवतार घेतो कधी प्रेमळ कृष्णाचा अवतार घेतो, कधी तोच कृष्ण विठेवरचा विठ्ठल बनतो. वृत्रासूर नावाच्या दैत्यासोबत युद्ध होते. त्यावेळी शुची ने तो धागा इंद्राच्या मनगटावर बांधला. आणि इंद्र ते युद्ध जिंकला. ही सत्य घटना असेल किंवा आख्यायिका असेल. काही गोष्टी समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहेत. इंद्र ह...

महाराष्ट्रीयन होळी

Image
  महाराष्ट्रीयन होळी डॉ. अलोक पवार "होळी रे होळी, पुरणाची पोळी", मार्च महिन्यात साधारण हे गाण प्रत्येक लहान मुलाच्या तोंडून ऐकायला येते. याचं सोबत आईवडिलांना मला ढोलकी पाहिजे, मग ही मुले होळीचा कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच दिवसभर होळीच्या बोंबा आणि ढोलकी वाजवून परिसर डोक्यावर घेतात.  श्रीकृष्णाला त्याच्या बाल्यवस्थेत दूध पाजून मारायला आलेल्या पुतणा राक्षसिणी चे प्रतिक म्हणजे होळी. बाळ कृष्णाने तिचे विषमयी दूध तर पिलेच पण तिला सळोखे पळो करून सोडले. व शेवटी ती भष्मसाद झाली. पुतनेला कृषांचा मामा कंस याने सोडले होते. अशी आणखीन एक गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची. राक्षस कुळात म्हणजेच हिरण्यकश्यपूच्या घरी जन्मलेल्या प्रल्हादाची. प्रल्हादाला लहानपणापासूनच नारायणाच्या भक्तीचे वेड होते. त्याच्या मुखातून नेहमी नारायण नारायण हा मंत्रोचार निघत असे. हिरण्याकश्यपूला स्वतःचा हा मुलगा आपल्या शत्रूचे नाव घेतोय हे त्याला अजिबात पटले नाही. त्याला तापत्या गरम तेलाच्या कढईत ठेवून पाहिले, तोंड बंद करण्याचे सर्व प्रयोग करून बघितले पण भक्त प्रल्हाद आपल्या जपात अजिबात अडखला नाही. त्याचे नामस्मरण चालूच. ...

भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज

Image
  भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज डॉ. अलोक पवार पहिले इतिहासात जाऊ मग भाऊबीज सणाचा अर्थ लावू. इतिहास म्हणजे या भाऊबीजेची आख्यायिका कधीपासून. तर या दिवशी यमराज याला आपल्या बहिणीच्या यमीच्या म्हणजेच यमुना नदीच्या घरून जेवायचे आमंत्रण येते. बहिणीने जेवायला बोलावले तर जावेच लागेल म्हणून यम आपली सर्व कामे सोडून यमुनेकडे जेवायला जातो. यमुनेने त्याला अगदी रेलचेल म्हणजे मिष्ठानांचे भोजन करतो. जेवण करताना तो फक्त आपल्या बहिणीचा विचार करतो. तिचे भले कसे होईल तिची भरभराट कशी होईल हे सर्व विचार त्याच्या डोक्यात असतात. त्याच्या रोजच्या कामांचा म्हणजे आपल्याला नरकातल्या लोकांचे प्राण हरायचे असतात हे तो स्पष्ट विसरतो. यमुना त्याला औक्षण करते. यम तिला आशीर्वाद देतो. यम आणि म्हणजेच याचं प्रेमाखातर भाऊबीजेला यमद्वितीया असे देखील म्हणतात.  हा झाला गोष्टीचा किंवा अख्यायिकेचा भाग. आजच्या दिवशी नदीत स्नान करावे असे देखील म्हणतात. यमुना नदी पावते, आपल्या भावाला नदीत स्नान करणाऱ्याचे रक्षण कर असे म्हणते. असो, गोष्टीवरून लक्षात येते की भाऊ कितीही कामात असला तरी आजचा दिवस खास बहिणीसाठी काढून बहिणीन...

कोजागिरी पौर्णिमा

Image
 कोजागिरी पौर्णिमा डॉ. अलोक पवार भारतातील बहुतांशी सण हे कृषीप्रधान किंवा निसर्गाशी एकरूप असे दिसून येतात. कोजागिरी पौर्णिमा हा देखील त्यांपैकी एक. शेतकरी मोठ्या भक्ती भावाने शेत कसतो, नांगरतो, त्यात बियाणे पेरतो, मशागत करतो आणि धान्य तयार करतो. याच शेतकऱ्याला हे धान्य विक्री करून पैसा कमवायचा असतो. यासाठी त्याला योग्य ज्ञानाची कास धरायची असते. त्याच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते. संध्याकाळी चंद्रप्रकाशात लक्ष्मी साक्षात इथे फिरते आणि साक्षात तिच पाहते की कोजागर... म्हणजेच कोण जागे आहे. हे कोण जागे आहे म्हणजे कोण ज्ञान प्राप्ती साठी इच्छुक आहे. शेतकऱ्याला उपदेशून पौर्णिमा असल्याने लक्ष्मी सोबत बळीराजाची देखील पूजा केली जाते. यादिवशी पृथ्वीभोंवती फिरणारा चंद्र पृथ्वीच्या भरपूर जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्र मोठा, सफेद आणि भरपूर तेजस्वी असा दिसतो. कोकणामध्ये याच पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हणतात. बाजारामध्ये बऱ्याच गोष्टींची रेलचेल असते. त्यामध्येही भाताच्या लोंब्या, कुर्डूची फुले, नाचणी, वराई विविध फुले त्यातही झेंडू अशा ...

सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन

Image
सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन  डॉ. अलोक पवार  भगवान महादेव कठोर तपस्या करून शेवटी सिद्धीदात्री देवी प्रसन्न होऊन त्यांना एकूण आठ सिद्धी म्हणजेच आणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा सिधी प्रदान करते. याच सोबत देवीचे अर्धे शरीर हे देवी पार्वती चे शरीर म्हणजे अर्धनारीनटेश्वर असे झाले होते. देवीचे हे रूप तेजस्वी शक्तिशाली असे होते. तिला एकंदरीतच सर्व देवांचे तेज, शक्ती प्राप्त झाल्या होत्या. म्हणून ती दुर्गेच असीम रूप म्हणायला काही हरकत नाही.     सिद्धीदात्री देवीचा विचार केला तर कोणत्याही व्यक्तीने मनापासून काही गोष्टींना साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते साध्य होते. बऱ्याच स्त्रिया आज राजकारणात, वैद्यकीय क्षेत्रात, अभियांत्रिकी क्षेत्रात, उच्च पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात शेती देखील स्त्रिया अगदी मनोभावे करतात आणि शेतातून पिक काढतात. बाजारात जे उत्पादन तयार झालेले आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम देखील स्त्रिया करतात. म्हणजेच आपण आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर संपूर्ण सप्लाय मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये या स्त्रिया आपली आगेकूच कर...

महागौरी : एका तपस्येची गोष्ट

Image
  महागौरी : एका तपस्येची गोष्ट डॉ. अलोक पवार देवी पार्वती जेंव्हा मोठी झाली तेंव्हा आपल्यासाठी वर म्हणून फक्त आणि फक्त महादेव असावेत हे त्यांनी मनाशी निश्चित केले होते. पण ते पाहिजे तितके सोप्पे नव्हते. म्हणून त्यांनी घनदाट जंगलात तपस्या केली. ही तपस्या एक दिवसाची नव्हती. भरपूर ऊन, पाऊस, थंडी भरपूर गोष्टींचा त्रास सहन करून पार्वती तपस्ये मध्ये अगदी ध्यानमय झाली होती. तिला तिच्या शरीराची काळजी नव्हतीच मुळी. तिला फक्त तिचा संकल्प जो होता, त्याची प्राप्ती करून घ्यावयाची होती. पार्वती बरीच दुबली आणि काळी देखील झाली होती. तिच्या शरीरा वरिल सर्वच तेज नाहीसे झाले होते. तिची एवढी कठोर आराधना पाहून भगवान महादेव प्रसन्न होतात आणि तिला वर मागण्यासाठी सांगतात. मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करा असे आवाहन ती करते, जे आवाहन महादेवांकडून स्वीकार होते. त्या वेळी तपस्या करून पार्वती ची जी अवस्था असते म्हणजे ती काळी - दुबळी झाली असते त्याला पूर्ववत करणे देखील गरजेचे असते. भगवान महादेवाने यासाठी आपल्या कमंडळू मधील गंगाजलाच्या मदतीने पार्वतीला पुन्हा तेजस्वी करतात. ती इतकी श्वेतवर्णीय होते की तिचे नाव ...