सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन
सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन
डॉ. अलोक पवार
भगवान महादेव कठोर तपस्या करून शेवटी सिद्धीदात्री देवी प्रसन्न होऊन त्यांना एकूण आठ सिद्धी म्हणजेच आणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा सिधी प्रदान करते. याच सोबत देवीचे अर्धे शरीर हे देवी पार्वती चे शरीर म्हणजे अर्धनारीनटेश्वर असे झाले होते. देवीचे हे रूप तेजस्वी शक्तिशाली असे होते. तिला एकंदरीतच सर्व देवांचे तेज, शक्ती प्राप्त झाल्या होत्या. म्हणून ती दुर्गेच असीम रूप म्हणायला काही हरकत नाही.
सिद्धीदात्री देवीचा विचार केला तर कोणत्याही व्यक्तीने मनापासून काही गोष्टींना साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते साध्य होते. बऱ्याच स्त्रिया आज राजकारणात, वैद्यकीय क्षेत्रात, अभियांत्रिकी क्षेत्रात, उच्च पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात शेती देखील स्त्रिया अगदी मनोभावे करतात आणि शेतातून पिक काढतात. बाजारात जे उत्पादन तयार झालेले आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम देखील स्त्रिया करतात. म्हणजेच आपण आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर संपूर्ण सप्लाय मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये या स्त्रिया आपली आगेकूच करताना दिसतात. सिद्धीदात्री देवी याच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते ज्या स्त्रिया स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला मदत करतात. यासाठी स्वतःला समजणे, स्वतःच्या अस्तित्वाला समजणे हे अतिशय महत्वाचे असते. जो स्वतःला समजू शकतो तो आणि तोच सिद्धी प्राप्त करू शकतो.
माणसाने जर ही सिद्धीदात्री देवी प्रसन्न करून घेतली म्हणजेच त्याला सिद्धी प्राप्त झाली तर त्याला आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही. या गोष्टीचा जर आपण नीट विचार केला तर सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न हा सातत्याने झाला पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठा झाली पाहिजे. आजकाल प्रयत्न हे कालाय तस्मे म्हणजे जर झाले तर झाले असे केले जातात. त्यामध्ये सातत्य असले पाहिजे. तरच विजय होतो. तरच सिद्धी प्राप्ती होते.
जय सिद्धीदात्री माता

Comments
Post a Comment