Posts

Showing posts from June, 2021

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

Image
वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी प्रा. पवार अलोक अर्जुन अलका ते दोघेही नोकरी करत होते. कला आणि मनोज दोघांची नोकरी अत्यावश्यक सेवेमधली होती त्यामुळे दोघांनाही नोकरीवर कोरोनाची भयानक परिस्थिती असूनही जावे लागत असे. एक बाजूला रोजचे मृत्यूचे वाढते आकडे कानावर यायचे. पण यांच्या नोकरीवरची सेवा त्यांना करायलाच लागे. एके दिवशी अचानक कलाला तिच्या नवऱ्याचा फोनवरून फोन येतो की, "तुमचे अहो सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत, त्यांना श्वास घ्यायला अतिशय प्रॉब्लेम होतोय. त्यांची कोरोना ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे." ही बातमी ऐकूनच कलाच्या पायाखालची जमीन हलते. कलाच्या सासू आणि सासऱ्यांना दोघांनाही मधुमेहाचा त्रास होता. सासऱ्यांचं नुकतंच अटॅक येऊन गेल्यामुळे मोठं आजारपण निस्तरल होत त्यामध्ये कला आणि मनोज च होत तेवढी साठवणूक घालवली होती.  कलाला आता सर्व निर्णय एकटीलाच घ्यायचे होते. ती कामावर होती त्यामुळे तिने त्वरित तिच्या वरिष्ठांना कळवून तेथून बाहेर पडली आणि सिटी हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली.  कोरोनाच्या परिस्थितीमुळे बाहेर न रिक्षा होती ना बस. तिचे घर जवळ असल्यामुळे ती घरून कामावर ये जा ही चालत...