महाराष्ट्रीयन होळी
महाराष्ट्रीयन होळी डॉ. अलोक पवार "होळी रे होळी, पुरणाची पोळी", मार्च महिन्यात साधारण हे गाण प्रत्येक लहान मुलाच्या तोंडून ऐकायला येते. याचं सोबत आईवडिलांना मला ढोलकी पाहिजे, मग ही मुले होळीचा कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच दिवसभर होळीच्या बोंबा आणि ढोलकी वाजवून परिसर डोक्यावर घेतात. श्रीकृष्णाला त्याच्या बाल्यवस्थेत दूध पाजून मारायला आलेल्या पुतणा राक्षसिणी चे प्रतिक म्हणजे होळी. बाळ कृष्णाने तिचे विषमयी दूध तर पिलेच पण तिला सळोखे पळो करून सोडले. व शेवटी ती भष्मसाद झाली. पुतनेला कृषांचा मामा कंस याने सोडले होते. अशी आणखीन एक गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची. राक्षस कुळात म्हणजेच हिरण्यकश्यपूच्या घरी जन्मलेल्या प्रल्हादाची. प्रल्हादाला लहानपणापासूनच नारायणाच्या भक्तीचे वेड होते. त्याच्या मुखातून नेहमी नारायण नारायण हा मंत्रोचार निघत असे. हिरण्याकश्यपूला स्वतःचा हा मुलगा आपल्या शत्रूचे नाव घेतोय हे त्याला अजिबात पटले नाही. त्याला तापत्या गरम तेलाच्या कढईत ठेवून पाहिले, तोंड बंद करण्याचे सर्व प्रयोग करून बघितले पण भक्त प्रल्हाद आपल्या जपात अजिबात अडखला नाही. त्याचे नामस्मरण चालूच. ...