Posts

Showing posts from November, 2020

बलिप्रतिपदा - पाडवा

Image
 बलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा बळीराजा - वामन - व्यूहरचना - दानशूरता... याच धर्तीवर आजचा सण साजरा करतो आहे. बळीराजा म्हणून एक प्रसिद्ध राजा, ज्याने आपली प्रजा नेहमी सुखी राहावी याचा विचार केला. बळीराजाच्या राज्यात प्रजा अत्यंत खुश होती कारण सर्वत्र शेतमळे फुलले होते. कृषी इतकी हिरवीगार होती की सर्व जण खाऊन अगदी आपल्या राजावर खुश होते. याच बळीराजाने आपले कार्यक्षेत्र देखील एक बाजूला वाढविण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने जवळ जवळ १०० अश्वमेघ यज्ञ केले. बळीराजाचा पुढचा अश्वमेघ यज्ञ हा देवराज इंद्र याला शह देण्यासाठीचा होता. बळीराजा आणि इंद्र हे दोन राजांमधील युद्ध होते. इतिहास ऐकला वाचला तर इंद्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तो थोडासा कावरा बावरा होतो ब्रम्हा विष्णू महेश यांच्या धावा करतो. यावेळी तो विष्णूकडे धाव घेतो.  जवळ जवळ १०० पेक्षाही जास्त अश्वमेघ यज्ञ करून इतके राज्य जिंकले यावर या बळीराजाची पुढची नजर जेंव्हा देवराजा इंद्राच्या नगरी वर गेली तेंव्हा विष्णूला थेट युद्ध तर शक्य नव्हते तेंव्हा त्याने बटू म्हणजेच वामन रूप धारण केले. आणि हा वामनरुपी विष्णू यज्ञस्थळी प...

लक्ष्मीपूजन

Image
  लक्ष्मीपूजन दिवाळीतील सर्वात मोठा आणि विशेष दिन. देव आणि दानवांच्या युद्धावेळी जे समुद्रमंथन झाले त्यातूनच लक्ष्मीची उत्पन्न झाली आणि पुढे ती विष्णुप्रिया म्हणजेच भगवान विष्णू यांची पत्नी बनली. हिंदू धर्मातल्या जवळजवळ प्रत्येक घरात किंवा कार्यालयात लक्ष्मीपूजन अगत्याने केले जाते. काहीही झाले तरीही लक्ष्मी प्राप्त करणे तिला आपल्या घरी आणणे. ती कायमची राहावी म्हणून दिवसरात्र मेहनत करणे हे प्रयत्न प्रत्येकजण करीत असतो. आणि ते करणे देखील गरजेचे आहेत. व्यक्ती शिकला की तो अर्थार्जना कडे वळतो. म्हणजे पैसे कमावण्यासाठी तो एकतर नोकरी किंवा व्यवसाय करतो. लक्ष्मी ही चंचल स्वरूपात असते असे म्हणतात म्हणजे ती एक जागी राहत नाही. त्यामुळे तिला सांभाळणे तितकेच जिकिरीचे काम असते. लक्ष्मीचे रूप किंवा लक्ष्मीचा संबंध थेट धनाशी जोडला गेला आहे, म्हणजे आपण धन कशाला म्हणतो आणि त्या धनाला आपण कसे जपले पाहिजे याचा लक्ष्मीपूजनाशी संबंध आहे असे म्हणावयास हरकत नाही. व्यक्ती काहीशा प्रमाणात आपली गृहस्थी चालवली जावी यासाठी अर्थार्जन करतो, तो काम करून पैसा घरी आणतो त्याला धन म्हणू शकतो. घरातील आजी आजोबा आपल्य...

नरकचतुर्दशी

Image
  नरकचतुर्दशी हा जो सण आहे तो आपण एक वेगळ्या प्रकारे समजावून घेणार आहोत. दिवाळी ही हिंदू धर्मीयांमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा हा एक सण आहे आणि त्यातलाच नरकचतुर्दशी हा एक महत्वाचा भाग. आधी आपण या नरकचतुर्दशी गोष्ट समजावून घेऊ, मग त्याच्या विश्लेषणात्मक भागाकडे वळूयात. भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातले एक मोठे योध्ये किंवा रणनितीकार म्हणावयास हरकत नाही. त्यांनी महाभारत पांडवांनी जिंकावे यासाठी बऱ्याच व्यूहरचना आखल्या होत्या. श्रीकृष्ण आणि महाभारत ही कथा वाचल्यास एक मोठा व्यवस्थापक एक मोठा लीडर समोर येताना दिसतो. मात्र महाभारताच्या देखील आधी इराक वर एक असुरी शक्ती राज करीत होती तो म्हणजे नरकासुर . या नरकासुराने अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित राहण्यासाठी ब्रम्हदेवकडून एक वरदान मागितले होते की कोणताही पुरुष देवता माझा वध करू शकत नाही माझा मृत्यू हा केवळ भुदेवी म्हणजेच पृथ्वीमाते कडून होऊ शकतो. मात्र याच वराचा दुरुउपयोग करून त्याने आपला अत्याचार सुरू केला. एकूण १६००० राजकन्यांना पळवून आणणे आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्या मर्जीशिवाय त्यांच्याशी विवाह करण्याचे काम त्याने केले. श्रीकृष्ण हा लह...

धनत्रयोदशी

Image
  धनत्रयोदशी अलोक पवार भारतामध्ये हिंदू धर्मामधील दिवाळीतील दुसरा दिवस. या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात. देव आणि दानव यांच्या भांडणातून जे समुद्रमंथन झाले त्यातूनच धन्वंतरी देवतेचे प्रकटीकरण झाले. धन्वंतरी देवाला आयुर्वेदात महत्व दिले गेले आहे. भारतामध्ये जी मेडिकल प्रक्टीस चालते त्यामध्ये अॅलोपथी आणि होमिओपॅथी सोबत आयुर्वेदिक द्वारे होणाऱ्या उपचाराला तितकेच महत्व दिले गेले आहे. हिंदू धर्मातील रामायणानुसार जेंव्हा लक्ष्मण जेंव्हा धारातीर्थी पडतो तेंव्हा त्याला पुनर्जीवित करण्यासाठी हनुमानाने श्रीलंकेमध्ये संजीवनी पर्वत उचलून आणला होता. त्या संजीवनी च्याच मदतीने लक्ष्मणाचे प्राण परत आले. भारतीय आयुर्वेदाच्या इतिहासामध्ये चरक ,  सुश्रुत , काश्यप , आचार्य   अश्विनीकुमार , भारद्वाज   , दिवोदास (काशिराज) ,  नकुल ,  सहदेव , अर्कि ,  च्यवन ,  जनक , बुध , जावाल , जाजलि ,  पैल , करथ ,  अगस्त्य ,  अत्रि   त्यांचे शिष्य अग्निवेश ,  भेड़ ,  जातूकर्ण ,  पराशर ,  सीरपाणि ,  हारीत हे सर्व आयुर्वेदिक अभ्यासक आ...

वसुबारस

Image
  वसुबारस भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतामध्ये जे सणवार साजरे केले जातात ते संपूर्ण कृषीच्या धर्तीवर आधारित झाले आहेत. दिवाळी हा देखील त्यावर आधारलेला एक.   या दिवाळीचा पहिला दिवा लागतो तो म्हणजे   वसुबारस   या दिवशी. हिंदू धर्माचा इतिहास पाहिल्यास देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध चालू   असताना जे समुद्रमंथन झाले त्यामधून पाच गायी उत्पन्न झाल्या त्यामध्येच कामधेनू गाईसोबत   नंदा   नावाची गाय देखील उत्पन्न झाली. तिच्या साठीचे हा सण. हिंदू धर्मातील बाळकृष्ण हा देखील गोकुळात वाढल्याची ख्याती आहे. कृष्णाचे आणि गाईंचे नाते हे सर्वांना माहिती आहे. गाईच्या लोण्याच्या गोळा चोरून खाणारा देवकीनंदन कृष्ण आणि त्याच चोरीतून देवकीमाईला    संपूर्ण ब्रह्मांड दाखविणाऱ्या बालकृष्णची गोष्ट सर्वांना माहिती असेलच. गावाकडे बहुतांशी शेतकरी बांधवांकडे गोधन असते. शेतकऱ्यांना हे गोधन अतिशय महत्वाचे असते. कारण शेतासोबत दुग्धजन्य पदार्थांचा जोडधंदा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीस हातभार लावत असतो. ग्रामीण भागामध्ये हा दूध व्यवसाय हा गोवंश वाढवून अधिकाधिक बळकट कसा केल...