Posts

Showing posts from February, 2021

पहिले जन्माला आलेले एकेरी पालकत्व

Image
  पहिले जन्माला आलेले एकेरी पालकत्व प्रा. अलोक अर्जुन अलका पवार लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्री पुरुषांना आपले स्वतःचे संतान व्हावे असे वाटत असते. त्यामध्ये आदी माता आणि आदि पुरुष ज्यांना संबोधले गेले आहे असे पार्वती आणि महादेव यांना सुद्धा वाटत असणारच. तसे कार्तिकेय त्यांचा प्रथम पुत्र. मात्र कार्तिकेयने आपल्या पित्याच्या सृष्टी संवर्धनाची जवाबदारी घेतल्याने देवी पार्वती यांच्या जवळ तो कमीच होता.  देवी असल्या म्हणून त्यांचं मातृत्व, बाळाचे लाड करायचे हे त्यांच्या ममतेमधून थोडे कमी होणार. पार्वतीचे निवासस्थान आपल्या पतीसोबत ते म्हणजे कैलास पर्वतावर. अगदी स्मशानात म्हणले तरीही चालेल. जिथे बऱ्याच जणांचे आपल्या महादेवाला भेटण्यासाठी येणे जाणे होते. कैलास पर्वतावर स्नान करताना आपल्याला कोणी बघू नये यासाठी पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून एक बालक तयार केला आणि साक्षात देवी असल्याने त्याला मूर्त स्वरूप दिले. आपल्या शरीरापासून तयार झालेले तेजस्वी बालक पार्वतीला स्वतःचे वाटले. आणि पहिलाच धडा पार्वतीने त्या बालकाला शिकवायला सुरवात केली. माझी अंघोळी आणि आवरून होईपर्यंत या कक्षात कोणासही...