Posts

Showing posts from September, 2022

कात्यायिनी देवी : आशेचा महिमा

Image
  कात्यायिनी देवी : आशेचा महिमा डॉ. अलोक पवार   माणूस जन्मला की त्याच्या गरजा वाढत जातात. समाजातील गोष्टी बघितल्या की त्याच्या गरजा वाढत वाढत जातात. मात्र बरेचदा असे बघितले गेले आहे की देव माझाच असावा ही देखील बऱ्याच भक्तांनी आपली गरज दाखवलेली आहे. आणि देव काय हो भक्तीचा भुकेला असतो.  अशीच गोष्ट आहे कात्यायन या भक्ताची. महर्षी कत यांचा पुत्र कात्यायन. तो देवीचा निस्सीम भक्त. देवीने आपल्या घरी जन्म घ्यावा. आपल्या घरी तिचा अवतार प्रकट व्हावा ही त्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भरपूर तप केले.  महिषासुर राक्षसाचा त्रास वाढल्याने ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी आपल्या शक्ती देऊन एका देवीला निर्माण केले. या देवीची प्रथम पूजा कात्यायन याने केली. आणि म्हणूनच या देवीला कात्यायनी हे नाव पडले. पुढच्या तीन दिवसांना देवी महिषासुराशी युद्धास सज्ज होत होती. कात्यायनाच्या घरी तो तिची पूजा करीत होता. युद्ध जिंकले गेले.  जर आपण कात्यायानीचा महिमा वाचला आणि लक्षात घेतला तर माणूस चांगली कर्मे करण्यासाठी नेहमीच मनाशी आशा बाळगत असतो. या आशा त्याला नेहमी प्रत्येक गोष...