आपल्यातच कुठेतरी असतो तो मारुती शोधला पाहिजे फक्त
आपल्यातच कुठेतरी असतो तो मारुती शोधला पाहिजे फक्त अलोक पवार आम्ही आधी पर्वती दर्शन ला राहायचो म्हणजे पर्वतीच्या अगदी जवळ. मला पप्पा सकाळी उठून पर्वती ला घेऊन जायचो. पर्वताच्या पायऱ्या चढून चढून मनात अनेक प्रश्न यायचे. कोणाची पर्वती. पेशव्यांची. मग काय या पेशव्यांना खाली असे मोक्याच्या ठिकाणी हे बांधकाम नाही का करता आले. उगाच एवढ्या उंचावर चालत जावे लागते. तेंव्हा अगदी बालबुद्धी होती. तेंव्हा अगदी पर्वती च्या मागे असलेली वाघजाई पर्यंत जाणे व्हायचे. पुण्याला पर्वती, तळजाई म्हणजे व्यायामाचे आणि व्यायाम करणाऱ्यांंसाठी एक मोठी देणगीच मिळाली आहे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक बाळ हे लहानपणी थोड्या उचपत्या करत असते. आपले हनुमान जी देखील असेच. आमच्या लहानपणी आम्हाला आंबा, चिक्कू अशा फळांचे आकर्षण. मात्र या बालक हनुमानाला असे थोडे थिडके छोटे फळ नाही त्याला तगडे मोठे फळ खाण्याची इच्छा झाली. कोणते माहिती थेट सूर्य. आणि तशी या बालकाने सूर्याकडे झेपही घेतली. अंजनी आणि केसरी या वानर कुटुंबातील हा बालक. लहानपणापासूनच चपळ. या बालकाच्या शक्तीने खरच सूर्याला ग्रहण केले तर. सर्वच देवता भयभीत हो...