धनत्रयोदशी
धनत्रयोदशी
अलोक पवार
भारतामध्ये हिंदू धर्मामधील दिवाळीतील दुसरा दिवस. या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात. देव आणि दानव यांच्या भांडणातून जे समुद्रमंथन झाले त्यातूनच धन्वंतरी देवतेचे प्रकटीकरण झाले. धन्वंतरी देवाला आयुर्वेदात महत्व दिले गेले आहे. भारतामध्ये जी मेडिकल प्रक्टीस चालते त्यामध्ये अॅलोपथी आणि होमिओपॅथी सोबत आयुर्वेदिक द्वारे होणाऱ्या उपचाराला तितकेच महत्व दिले गेले आहे.हिंदू धर्मातील रामायणानुसार
जेंव्हा लक्ष्मण जेंव्हा धारातीर्थी पडतो तेंव्हा त्याला पुनर्जीवित करण्यासाठी
हनुमानाने श्रीलंकेमध्ये संजीवनी पर्वत उचलून आणला होता. त्या संजीवनी च्याच
मदतीने लक्ष्मणाचे प्राण परत आले. भारतीय आयुर्वेदाच्या इतिहासामध्ये चरक, सुश्रुत, काश्यप, आचार्य अश्विनीकुमार, भारद्वाज , दिवोदास (काशिराज), नकुल, सहदेव, अर्कि, च्यवन, जनक, बुध,
जावाल, जाजलि, पैल, करथ, अगस्त्य, अत्रि त्यांचे शिष्य अग्निवेश, भेड़, जातूकर्ण, पराशर, सीरपाणि, हारीत हे सर्व आयुर्वेदिक अभ्यासक आणि प्रवर्तक दिसून येतात.
हिंदू धर्मातील चारही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या सर्व
वेदांमध्ये आयुर्वेदाचे महत्व सागितले आहे. धन्वंतरी हे देवतांचे डॉक्टर म्हणून
प्रसिद्ध आहेत.
धनत्रयोदशीला
कोथिंबीरीच्या बिया म्हणजेच धने याची देखील पूजा करण्याची आख्यायिका आहे. कोथिंबीर
हि सर्वसाधारणपणे सर्व भाज्यांमध्ये वापरली जाते. मात्र कोथिंबीर ही नाशवंत भाजी
असल्याने तिचा वापर त्वरित झाला पाहिजे. धने हे मसाले बनविण्यासाठी वापरले जातात.
धनेपूड किंवा कोथिंबीर ज्या भाजीमध्ये टाकले जाते त्याचा सुगंध अतिशय सुंदर येतो.
धनत्रयोदशीला लक्ष्मीला धने दाखवून पूजा केली जाते व दुसऱ्या दिवशी त्याच धण्याची
पेरणी केली जाते. जर त्या धण्यापासून हिरवीगार कोथिंबीर उगवली तर त्या व्यक्तीवर
लक्ष्मी प्रसन्न राहते व त्याचे आरोग्य चांगले राहते. मात्र जर कोथिंबीर पिवळी
उगवली तर त्या व्यक्तीचे आरोग्य अडचणीत आहे असे समजतात एकंदरीत शास्त्रीय अर्थ
लावला तर बीजपरीक्षणासाठी हा सण आपण साजरा करतोय असे म्हणायला हरकत नाही.
या दिवशी चांदीचे पदार्थ खरेदी करणे शुभ मानले जाते. चांदी थंड प्रवृत्तीची असल्याने चांदीच्या ताटात जेवल्याने बहुतांशी शाररीक आणि मानसिक रोग दूर होतात. लहान बाळांना चांदीच्या ताटात जेवण घातल्याने किंवा चांदीच्या ग्लासातून पाणी पाजल्याने त्याचे आरोग्य सुधारते. बाळाला होणारे आजार जसे की पोटदुखी, डायरिया, तसेच अन्य पोटासंदर्भात इतर यांच्यापासून त्याचे रक्षण होते. चांदीचा अंश पोटात गेल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते, तसेच इतर काही संसर्गापासून देखील रक्षण होते. तसेच वात किंवा कफ यासारख्या आजारापासून देखील रक्षण होते.
अलोक पवार

Comments
Post a Comment