महाराष्ट्रीयन होळी
महाराष्ट्रीयन होळी
डॉ. अलोक पवार
"होळी रे होळी, पुरणाची पोळी", मार्च महिन्यात साधारण हे गाण प्रत्येक लहान मुलाच्या तोंडून ऐकायला येते. याचं सोबत आईवडिलांना मला ढोलकी पाहिजे, मग ही मुले होळीचा कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच दिवसभर होळीच्या बोंबा आणि ढोलकी वाजवून परिसर डोक्यावर घेतात.
श्रीकृष्णाला त्याच्या बाल्यवस्थेत दूध पाजून मारायला आलेल्या पुतणा राक्षसिणी चे प्रतिक म्हणजे होळी. बाळ कृष्णाने तिचे विषमयी दूध तर पिलेच पण तिला सळोखे पळो करून सोडले. व शेवटी ती भष्मसाद झाली. पुतनेला कृषांचा मामा कंस याने सोडले होते.
अशी आणखीन एक गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची. राक्षस कुळात म्हणजेच हिरण्यकश्यपूच्या घरी जन्मलेल्या प्रल्हादाची. प्रल्हादाला लहानपणापासूनच नारायणाच्या भक्तीचे वेड होते. त्याच्या मुखातून नेहमी नारायण नारायण हा मंत्रोचार निघत असे. हिरण्याकश्यपूला स्वतःचा हा मुलगा आपल्या शत्रूचे नाव घेतोय हे त्याला अजिबात पटले नाही. त्याला तापत्या गरम तेलाच्या कढईत ठेवून पाहिले, तोंड बंद करण्याचे सर्व प्रयोग करून बघितले पण भक्त प्रल्हाद आपल्या जपात अजिबात अडखला नाही. त्याचे नामस्मरण चालूच. त्याला त्याचा नारायण सर्वच ठिकाणी अगदी सुखरूप ठेवत होता. पुढे हिरण्यकश्यपूला जेंव्हा आपल्या बहिणीच्या म्हणजेच होलिका राक्षशिण हिच्या वरदानाची माहित झाली तेंव्हा त्याने तिला तातडीने बोलावून घेतली. अग्नी होलिकेला जाळू शकत नव्हता असा तिला वर होता. स्वतःचा मुलगा मारला गेला तरी चालेल, तो आगीत भस्म झाला तरी चालेल मात्र हा "नारायण नारायण" स्वर मला पुन्हा ऐकायचा नाही ही हिरण्याकश्यपूची मनोकामना होती. म्हणून प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसायला होलिकेला सांगितल गेले. राक्षसी वृत्तीच्या होलिकेने त्वरितच आदेश मानत प्रल्हादाला घेऊन आगीत प्रवेश केला. प्रल्हादाला आपल्या नारायणावर विश्वास तर होताच त्याच्या तोंडून कुठे नारायण नारायण करणे थांबत होते. अग्नी भस्म करणार नाही हा वर प्राप्त होऊन सुद्धा होलिका आगीत भस्म झाली तिचे गर्वहरण झाले. त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की जर होलिकेने आपल्या वरदानाचा गैरवापर केला तर तो वर नाहीसा होणार. त्यामुळे होलिका जळली आणि भक्त प्रल्हाद त्या आगीतून सुखरूप बाहेर आला. खरे तर त्या होलिकेला त्या राक्षसी योनीतून मुक्तता मिळाली. आपल्या अंगातील तोच प्रतिशोध, गर्व, दहन करण्याच्या आजचा दिवस. याठिकाणी प्रश्न असा आहे की भक्त प्रल्हाद भक्त होता तरीही पूजा होलिकेची का? होलिका हे सूर्यास्तानंतर झालेल्या असत्यावर सत्याचा विजय. मनात एखाद्याबद्दल चांगले करण्याची भावना असेल तर चांगले होईल नाहीतर होळीकेसारखे मोक्षाला जाण्याशिवाय पर्याय नाही.
आपले भारतीय सण हे सर्वच कृषीप्रधान गोष्टींवर आधारभूत आहेत. जर वरील अध्यात्मिक गोष्टी बाजूला ठेवल्या तर होळी हा सुद्धा कृषीप्रधान सण. मार्च महिन्याच्या सुरवातीला गहू, ज्वारी, आणि बाजरी ची काढणी सुरु होते. थंडी मध्ये या झाडांचा हुरडा आपण खाल्ला होता ते धान्य आता परिपूर्ण झाले, ते धान्य शेतातून काढण्याचा हा हंगाम. मग काही लोंब्या या होळीत स्वाहा करण्याचा आजचा दिवस. आपला शेतकरी दादा आधीपासून असाच विचार करतो की मला आलेले पाहिले पिक मी आहुतीमध्ये सोडले की ते परमेश्वराकडे जाईल आणि तो मला भविष्यात येणाऱ्या सर्व संकटांपासून मग त्यामध्ये कमी पाऊस, अतिपाउस, किटके यांच्या पासून संरक्षण देईल. हा जो विश्वास आहे ना तो होळीच्या सणापासून दांडगा होतो.
होळीला एका छोट्या खड्यात लाकडे उभी करतात. त्या भोंवती पेंढी आणि गवऱ्या ठेवल्या जातात. रांगोळी काढली जाते. संध्याकाळच्या सुमारास ही होळी पेटवली जाते आणि बायका त्या होळीभोवती टिप टिप पाणी सोडतात. पुरण पोळीचा नैवैद्य दाखविला जातो. घरी सागरसंगीत जेवण असते त्याचा देखील प्रसाद दाखवला जातो. काही पुरुष मंडळी या होळीत नारळ अर्पण काढतात. भाजून निघालेला नारळ पुन्हा बाहेर काढून त्याचा प्रसाद करणे हा देखील हा एक खेळ समजला जातो. महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये आणि एकूणच कोकणात होळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याठिकाणी होळीला अनेक नावे सुद्धा आहेत.

Comments
Post a Comment