महागौरी : एका तपस्येची गोष्ट

 महागौरी : एका तपस्येची गोष्ट

डॉ. अलोक पवार

देवी पार्वती जेंव्हा मोठी झाली तेंव्हा आपल्यासाठी वर म्हणून फक्त आणि फक्त महादेव असावेत हे त्यांनी मनाशी निश्चित केले होते. पण ते पाहिजे तितके सोप्पे नव्हते. म्हणून त्यांनी घनदाट जंगलात तपस्या केली. ही तपस्या एक दिवसाची नव्हती. भरपूर ऊन, पाऊस, थंडी भरपूर गोष्टींचा त्रास सहन करून पार्वती तपस्ये मध्ये अगदी ध्यानमय झाली होती. तिला तिच्या शरीराची काळजी नव्हतीच मुळी. तिला फक्त तिचा संकल्प जो होता, त्याची प्राप्ती करून घ्यावयाची होती. पार्वती बरीच दुबली आणि काळी देखील झाली होती. तिच्या शरीरा वरिल सर्वच तेज नाहीसे झाले होते. तिची एवढी कठोर आराधना पाहून भगवान महादेव प्रसन्न होतात आणि तिला वर मागण्यासाठी सांगतात. मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करा असे आवाहन ती करते, जे आवाहन महादेवांकडून स्वीकार होते. त्या वेळी तपस्या करून पार्वती ची जी अवस्था असते म्हणजे ती काळी - दुबळी झाली असते त्याला पूर्ववत करणे देखील गरजेचे असते. भगवान महादेवाने यासाठी आपल्या कमंडळू मधील गंगाजलाच्या मदतीने पार्वतीला पुन्हा तेजस्वी करतात. ती इतकी श्वेतवर्णीय होते की तिचे नाव महागौरी पडते. 



तिची तपस्या साधी नव्हती. एक परीक्षाच होती शंकराला प्राप्त करण्याची ज्यात ती पास झाली.  आयुष्यात बऱ्याच गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी तपस्या करावी लागते. आता ही तपस्या म्हणजे देवी पार्वती सारखी जंगलात जाऊन आराधना करणे इतकेच नव्हे. तर जर एखाद्या स्त्रीला आयुष्यात स्वतःचे करिअर करायचे असेल तर तिला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या परीक्षा दयावा लागतात. त्या परीक्षेसाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करताना तिला एकाग्रचित्त व्हावे लागते. कदाचित बाह्य जगाशी संपर्क देखील तोडावा लागतो. मग जाऊन सुंदर यशप्राप्ती मिळते. देवी महागौरी याचं सर्व स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. आपल्याला जे साध्य करावयाचे लक्ष आहे त्याच्याकडे बघायचे आहे. ते सर्व करताना कदाचित स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकते मात्र त्याची प्राप्ती झाल्यावर चेहऱ्यावर जे तेज येते ते निराळेच असते. आता ते तेज म्हणजे फक्त गौरवर्ण इतकेच नव्हे हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. 

जेंव्हा पार्वती तिची तपस्या करित होती, तेंव्हा तिथे एक सिंह आला. पार्वती कडे बघून त्याच्या मनात तिला खाण्याची लालसा उत्पन्न झाली. मात्र पार्वती तपस्येमध्ये होती त्यामुळे तो तिथे तिची तपस्या संपण्याची वाट पाहू लागला. पार्वतीची तपस्या ही एक दोन दिवसांची नव्हती. भरपूर काळाची होती. तो देखील तिथे तसाच थांबला. पार्वती जेंव्हा महागौरी रूपात आली तेंव्हा तिची नजर त्या दुबळ्या झालेल्या सिंहावर गेली. त्या सिंहावर महागौरी ला दया आली. आणि तेंव्हापासून पार्वती ची दोन वाहने झाली एक म्हणजे बैल आणि दुसरा सिंह. हे देखील पार्वती चे तेज होते तीने तिच्या तेजातून मांस खाणारा सिंह देखील शांत झाला होता. 

जय महागौरी माता...

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त