भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज

 भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज

डॉ. अलोक पवार

पहिले इतिहासात जाऊ मग भाऊबीज सणाचा अर्थ लावू. इतिहास म्हणजे या भाऊबीजेची आख्यायिका कधीपासून. तर या दिवशी यमराज याला आपल्या बहिणीच्या यमीच्या म्हणजेच यमुना नदीच्या घरून जेवायचे आमंत्रण येते. बहिणीने जेवायला बोलावले तर जावेच लागेल म्हणून यम आपली सर्व कामे सोडून यमुनेकडे जेवायला जातो. यमुनेने त्याला अगदी रेलचेल म्हणजे मिष्ठानांचे भोजन करतो. जेवण करताना तो फक्त आपल्या बहिणीचा विचार करतो. तिचे भले कसे होईल तिची भरभराट कशी होईल हे सर्व विचार त्याच्या डोक्यात असतात. त्याच्या रोजच्या कामांचा म्हणजे आपल्याला नरकातल्या लोकांचे प्राण हरायचे असतात हे तो स्पष्ट विसरतो. यमुना त्याला औक्षण करते. यम तिला आशीर्वाद देतो. यम आणि म्हणजेच याचं प्रेमाखातर भाऊबीजेला यमद्वितीया असे देखील म्हणतात. 



हा झाला गोष्टीचा किंवा अख्यायिकेचा भाग. आजच्या दिवशी नदीत स्नान करावे असे देखील म्हणतात. यमुना नदी पावते, आपल्या भावाला नदीत स्नान करणाऱ्याचे रक्षण कर असे म्हणते. असो, गोष्टीवरून लक्षात येते की भाऊ कितीही कामात असला तरी आजचा दिवस खास बहिणीसाठी काढून बहिणीने केलेल्या गोड धोड खाण्याच्या दिवस. तीनशे पासष्ट दिवस काम केले, कामाचे पैसे मिळाले तरी एक दिवस बहिणीला, तिच्या प्रेमाला समजले तर पाहिजे ना? बहीण छोटी असली किंवा मोठी असली तरीही तिच्या औक्षणाची ताकद भावाकडे उदंड आयुष्य राहते. दिव्यातून तेज प्राप्त होते, सोन्याने भरभराट होते, तांदुळांनी प्रगतीचा वर्षाव होतो आणि मिष्ठणांनी आरोग्य आणि पोटभर भूक निस्तरते. 

असा हा बहीण - भावांचा दिवस. 

सर्व बहिणींना दंडवत नमस्कार. सर्व भावांना भरपूर प्रेम.

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त