बकरी ईद

बकरी ईद ... ईद मुबारक 

रमजान या पवित्र महिन्यानंतर बरोबर ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मुस्लीम धर्मीयांमध्ये हा एक मुख्य सण म्हणून साजरा केला जातो. या ईद ला ईद अल अजहा ज्याचा अर्थ कुर्बानी साठीची ईद असाही होतो. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार हजरत इब्राहीम यांनी ईश्वराच्या सांगण्यानुसार ईश्वरी परंपरेला अनुसरून त्याच्या वाटेवर योग्य दिशेने जाण्यासाठी त्यांच्या मुलाची म्हणजे हजरत इस्माईल ला बळी देण्याचे ठरवले. मात्र ज्या वेळी हा बळी दिला जात होता त्यावेळी हजरत इस्माईलच्या जागी अचानक बकऱ्यांचा बळी गेला आणि इस्माईल वाचला. ही ईश्वरी शक्ती त्याची आठवण असावी म्हणून ही ईद साजरी केली जाते. 

बकरी ईद ही इस्लामिक धर्माच्या अनुसार हिजरी च्या शेवटच्या महिन्यात जू अल हज्जा मध्ये साजरा केला जातो. जगभरातील सर्व मुस्लीम बांधव सौदी अरेबियातील मक्का येथे जमतात. एकंदरीतच मक्क्यात या ईदला एक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. मुसलमानांचा पवित्र ग्रंथ कुराण च्या अनुसार मानवाला बीज असलेली फळे खायचा आदेश दिला आहे तर प्राणांना गवत - झाडपाला खाण्याचा आदेश आहे. कुराणात कोठे जर मांस खाण्याचा आदेश असेल तर तो ईश्वराचा नसून तो जिब्रइल देवतांचा आहे. खरे तर जर इस्माईलचा ईश्वराने मागितलेला बळी हा चुकीच्या पद्धतीने दर्शविला जातो. हा मुळात तसा नव्हता. ईश्वराने जो बळी मागितला होता, तो त्यागाचा होता. स्वतःचा सुखाचा आनंदाचा, आणि आरामाचा त्याग करणे म्हणजेच इथे कुर्बानी द्यायची होती अशा गोष्टींची जी मानवाला स्वत:चे सुख इतकेच लक्षात राहते आणि तो इतर बाह्य जग विसरतो, तो याच काळात मानवता देखील विसरतो. ईश्वराने या सगळ्या गोष्टींचा बळी देऊन स्वत:ला मानवतेच्या वाटेवर जाण्यासाठी सांगितले. बकऱ्याचा बळी गेल्यावर आणि सत्य लक्षात आल्यावर हजरत इब्राहीम यांनी त्यांच्या बळी न गेलेल्या मुलाला आणि पत्नीला मक्का येथे ठेवले आणि स्वत: मानवी सेवा करण्यासाठी बाहेर पडले. त्याकाळी मक्का हे फक्त वाळवंट होते. मात्र आज त्याच त्याच मक्क्याला पवित्र स्थळ मानले जाते. 

या ईदच्या दिवशी सर्वांनी नवीन कपडे परिधान करून नमाज पडणे हे महत्वाचे समजले जाते व त्यानंतर इब्राहीम चे प्रतिक म्हणून मनाने आणि आर्थिक निकषाने देखील श्रीमंत व्यक्तीने सर्वोत्तम असा पाळीव प्राणी (शक्यतो गाय, वाळवंटी प्रदेशाला अनुसरून उंट, किंवा बोकड अथवा मेंढी ) बळी देणे अनिवार्य आहे. भारतातील काही क्षेत्रांमध्ये गाय म्हणजेच गोमांस बंदी असल्याने शक्यतो मुस्लीम लोक बोकडाचा बळी देणे पसंती दर्शवितात. या सर्व प्राण्यांच्या बळीच्या आधी त्या प्राण्याचे वय म्हणजेच तो किमान एक वर्षाचा असणे गरजेचे आहे. त्याची शरीरयष्टी देखील लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. तो आजारी नाही न हे देखील लक्षात घेतले जाते.  जर त्यात चुकी झाली तर तो बळी ग्राह्य धरला जात नाही. बळी दिलेल्या प्राण्याची तीन भागात विभागणी केली जाते. एक भाग कुटुंबात खाल्ला जातो, दुसरा भाग नातेवाईक, मित्र किंवा अगदी शेजारी लोकांमध्ये देखील वाटला जातो. व तिसरा भाग गरजू गरीब लोकांमध्ये वाटला जातो. आपण हे उर्जा देणारे भोजन हे आपणच खाऊन संपवणे यापेक्षा गरीबांमध्ये वाटणे ही या सणाची शिकवण आहे हे म्हणायला काही हरकत नाही.  

सर्वत्र जिथे मुस्लीम बांधव राहतात तिथे ही ईद मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. सकाळी सर्व मुस्लिम मस्तपैकी नवीन कपडे घालून सर्वांना या ईदच्या शुभेच्या देतात. एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्या देऊन बोकडाला हलाल केले जाते. चुलीवर बोकडाला खमंग शिजवले जाते. आणि सर्वच जण या शाही भोजनाचा आस्वाद घेतात. 

सर्वांना बकरी ईद च्या शुभेच्छा !       


Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त