छटपूजन : सुर्यपूजन
छटपूजन : सुर्यपूजन
अलोक पवार
आपल्या भारतातील एकदंरीतच सर्व सण हे आपल्याला निसर्गाला देव मानायला शिकवते. छटपूजन हा त्यापैकीच एक सण. प्रामुख्याने हा सण उत्तर भारतीय लोकांमध्ये आणि त्यातूनही बिहारी बांधवांमध्ये साजरा केला जातो.
सूर्याला शक्यतो मित्र म्हणले जाते. ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत म्हणून सूर्याकडे बघितले जाते. सूर्याच्या प्रकाशामुळे पूर्ण अंतराळ प्रकाशमयी होते. समुद्राची भरती ओहोटी होणे हे देखील सूर्य आणि चंद्राच्या असण्याने होते. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेत तर सूर्याचा प्रामुख्याने मोठा हस्तक्षेप आहे. हिरव्या झाडांमध्ये हरीतलवके बनण्याची प्रक्रिया ही देखील सुर्यामुळे होते. आणि एकंदरीतच आपले जेवण हे त्यावर अवलंबून असते असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे सूर्य आपल्याबरोबर संपूर्ण जीव जंतूंचा देखील पालनकर्ता आहे हे म्हणावयास हरकत नाही.
इतिहासात किंवा पौराणिक कथांना अनुसरून देव आणि असुर यांच्या भांडणात जेंव्हा देव हरायला लागले तेंव्हा आदिती देवीने सुर्यपूत्र यम आणि त्याची बहीण षष्ठी देवीची पूजा करून सुर्यदेवासारखा तेजस्वी पुत्र प्राप्ती केला आणि त्याच्या मदतीने देवांनी पुन्हा युद्ध जिंकले.
सूर्य देवाची पूजा किंवा षष्ठी मातेची पूजा करताना काही धनाची आवश्यकता किंवा ब्राम्हण, गुरुजी यांची गरज लागतेच असे नाही. ती सामान्य स्त्री किंवा पुरुषाने सूर्याकडे यांच्याकडून उपवास करणे, नैवेद्य दाखवणे आणि अर्ध्य देणे या गोष्टी करून करता येते.
पौराणिक गोष्टींमध्ये रामायनानुसार राम आणि सीता यांनी पण वनवासातून आल्यानंतर त्यांनी सुर्यपूजन छटपूजन केले. महाभारतातील कर्णतर सुर्यपूत्र, त्याचा आराध्य म्हणून ओळखला जातो. द्रौपदी ने देखील छटपूजन केले हे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.
सूर्याला नदी किंवा तलावात उभे राहून अर्ध्य देणे, त्याला गूळ, तांदूळ, गहू यांनी बनविलेला नैवैद्य दाखवणे या गोष्टी देखील केल्या जातात. या कालावधीत फलाहार देखील सूर्याला दाखविला जातो. हा प्रामुख्याने ग्रामीण दर्शन देणारा असा एक सण आहे. बिहार मध्ये गंगा नदीमध्ये उभे राहून हे अर्ध्य दिले जाते. व पूजा झाल्यावर त्याच नदीचे पाणी जेवणात वापरण्यास गंगाजल आणले जाते. म्हणजेच स्वच्छता आणि समृद्धी देखील या ठिकाणी महत्वाची आहे. या सणाच्या दिवशी एकूण नगर स्वच्छता ठेवणे, आणि नदीचा किनारा देखील स्वच्छ केला जातो.
नेहमीची कामे करणाऱ्या, संसारात अडकलेल्या स्त्रिया या दिवसात पूजा करीत असतात. उपवास सोडताना गोडधोड खात असतात. त्यांचा परिवारही हा उत्सव म्हणून साजरा करतात. लोक एकत्र येतात. या सणामध्ये कोणी गरीब श्रीमंत नसतो. सगळे जण सामुदायिक भावनेने पूजा करीत असतात.
सूर्याची उपासनाया करण्याचा हा दिवस, षष्ठी मातेचं नाव घेऊन साजरा करण्यात आलेल्या या छटपूजनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा!!
Comments
Post a Comment