चंद्रघंटा : महिषासुरमर्दिनी

 चंद्रघंटा : महिषासुरमर्दिनी

पवार अलोक अर्जुन अलका

परिस्थिती नेहमीच सारखी असते असे नसते. कुठे तरी सर्व व्यवस्थित चालु असले तर विचित्र अशी परिस्थिती नेहमी होत असते. देवांची परिस्थिती देखील अशीच होती. महिषासुर नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. भूलोकसोबत स्वर्गावर देखील त्याला त्याचे अधिपत्य पाहिजे होते. यासाठी तो इंद्र देवावर देखील चाल करून गेला. युद्धात हरल्यावर इंद्र आणि संपूर्ण देवगण मदतीसाठी त्रिदेवांकडे धावून गेले. महिषासुराला मिळालेल्या वरामुळे तो अतिशय शक्तिशाली होता. त्याला चितपट करण्यासाठी एका स्त्री शक्तीची गरज होती. त्यामुळे देवी पार्वतीने संपूर्ण तयारी केली.ब्रम्हा, विष्णू आणि महेशाची क्रोधाग्नी पार्वतीला मिळालाच होता. त्यासोबतच महादेवाने तिला स्वतःचे त्रिशूल दिले, विष्णूने स्वतःचे सुदर्शन चक्र दिले. सूर्याने स्वतःकडून तेज आणि तलवार दिली. इंद्राने स्वतःच्या राज्याची काळजी घेण्यासाठी देवीला स्वतःकडून वज्रास्त्र आणि एक घंटा दिली. चंद्र स्वतःच देवीच्या मस्तकावर आरूढ झाली. देवीच्या या स्वरूपावरून तिचे नाव चंद्रघंटा पडले.

दशभुजधारी चंद्रघंटा महिषासुरावर आगेकूच करून गेली. महिषासुरासमोर त्याचा काळ उभा होता. चंद्रघंटा माता आणि महिषासुरामध्ये युद्ध सुरू झाले. चंद्रघंटा मातेने महिषासुराचा पराभव केला आणि ती महिषासुरमर्दिनी बनली.


महिलांनी जर जिद्द पकडली तर कोणत्याही गोष्टी त्या सहज करू शकतात. वाटेत अडथळे येतात मात्र समाजातील सर्व घटकांना कोणाला विष्णू, कोणाला महेश, कोणाला इंद्र तर कोणाला सूर्य बनून त्या स्त्रीला मदत करणे गरजेचे असते. सध्या देखील पृथ्वी वर बरेच महिषासुर आहेत जे महिलांच्या चारित्र्याचे हनन करण्याचा प्रयत्न करतात, मात्र हे स्त्री तू कमजोर आहेस तू या असुरांचा सामना कसा करू शकते या ऐवजी तूच आहेस जी या असुरी प्रवृत्तीचा वध करू शकते त्यासाठी तू कराटे, ज्यूडो, बॉक्सिंग, शरीरयष्टी कमावणे या गोष्टी कर हे तिला सांगणारे तिला भेटले पाहिजेत. 

देवी चंद्रघंटा याच महिलांचं प्रतिनिधित्व करते ज्या महिलांना महिषासुरासारख्या असुरांचा सामना करायला लागू शकतो तेंव्हा न डगमगता आपल्याला नेहमीच तयार राहायला पाहिजे. आपले संपूर्ण शरीर आपल्याला सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सजग बनवत असते. जेंव्हा एक सामान्य स्त्री घरात काम करताना लाटणे, झाडू, रवी, उखळ, जात्याचा दांडा, विळा, कोयता घेऊन घरातील कामे करू शकते तेंव्हा ती कोणतेही काम अगदी सहजतेने करू शकते.

गरज आहे ही चंद्रघंटा देवी समजण्याचा. ती सामान्य महिलेच्या रुपात आहे तिला मूर्त चंद्रघंटा बनविण्याची जवाबदारी आपली आहे हे समजण्याचा. 

जय चंद्रघंटा माता.

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त