स्कंदमाता : आई जननी
स्कंदमाता : आई जननी
अलोक पवार
एकदंरीतच आईला जगामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वक्षेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येक स्त्रीला मूल झाले की तिला सर्वस्व येते असे म्हणतात. देवी पार्वती जरी जगाची माता झाली ना तरी तिला मुलांची आवड ही तिच्या संपूर्ण जीवनावरून दिसून येतात. जेंव्हा महादेवाने जगाची काळजी घेण्यासाठी आपल्या पुत्राला जवाबदारी दिली तेंव्हा पार्वतीने तिच्याकडेच तिच्यासाठी म्हणूनच एका पुत्राची निर्मिती केली. त्याच गणेशाला आराध्य बनविण्यासाठी पार्वतीने केलेला आटापिटा पण सर्वांना माहिती आहे. पण ही स्कंदमातेची कहाणी गणेशाच्या जन्माच्या आधीची.
स्कंद कुमार म्हणजेच कार्तिकेय. सहा मुखी कार्तिकेय हा माता पार्वती आणि भगवान महादेव यांचे पुत्र. स्कंद कुमार यांनी देवीला आई बनण्याचे सुख प्रदान केले आणि म्हणूनच पार्वती झाली स्कंदमाता. आई नक्की काय असते, आपल्या लेकरासाठी ती किती झटते, त्याला वाढविण्यासाठी ती किती कष्ट घेते याचे ही आदिमाता स्कंदमाता जगासमोर आई म्हणून मांडणी करणारी पहिली स्त्री.
एकंदरीतच मातृत्व असणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारी ओळख म्हणजे स्कंदमाता. मातृत्वामध्ये एक आपल्यासारखा नाकी डोळे असलेला एक जीव उत्पन्न करणे, त्याचे प्राथमिक संगोपन होण्यासाठी त्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवणे, जन्म झाल्यावर त्याला दूध पाजणे, त्याची संगोपणा करणे, त्याच्या वाढीसाठी स्वतःची झीज करणे या सर्व गोष्टी आईला कराव्या लागतात.
या सर्व गोष्टी स्वीकारण्यासाठी दणकट असणे गरजेचे आहे. आई बनणे ही स्वतःमध्ये एक बळकटी आणणारी गोष्ट आहे. मात्र आई होण्यासाठी स्त्रीने स्वतःचे निर्धारण केले पाहिजे. शास्त्रीय आणि सध्याच्या अगदी शासकीय नियमाने अगदी मुलींच्या लग्नाचे वय देखील १९ व त्यावर हवे. म्हणजे लग्नानंतर याच नववधू एका योग्य अवस्थेत नवीन बालकाचे पालकत्व स्वीकारू शकतात.
बाळ जन्माला आले की बालकाच्या वाढीसोबत आईकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. बालकाचे पोषण तर आईच्या दुधातून होत असते. पण आईला देखील पोषणयुक्त आहार प्राप्त होणे गरजेचे होते.
आईचे महत्व जाणून घेऊ आजच्या दिवशी निर्धार करू
जय स्कंदमाता आई
Comments
Post a Comment