देवी कुष्मांडा : नवनिर्माती
देवी कुष्मांडा : नवनिर्माती
अलोक पवार
कुष्मांडा देवी नवनिर्माण करणारे द्योतक आहे. तिला आदिशक्ती देखील म्हणले जाते. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने पृथ्वीची रचना केली. मात्र साक्षात त्याची रचना कोठून केली हे गुलदस्त्यात आहे. कुष्मांडा देवी ही सुर्यमंडळात राहते. तिनेच संपूर्ण सृष्टी निर्माण केली, सुरवातीलाच तिने आपल्या तीन डोळ्यांच्या साहायाने महाशक्ती, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींची निर्मिती केली व त्यांच्यासाहाय्याने पुढे ब्रम्हा विष्णू महेश यांची देखील निर्मिती झाली. एकूणच सुष्टी आणि जीव निर्माण केल्यामुळे या देवीला आदिशक्ती देखील म्हणले जाते.
एकदा निर्माण झाले तर काम अजिबात संपत नसते. या पृथ्वीवर कोणतीच गोष्ट शाश्वत अशी राहत नाही. प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टींचा ध्यास हा महत्वाचा असतो. भारतातल्या बऱ्याच स्त्रिया अगदी परग्रहांच्या शोधमोहिमेत देखील दिसतात. मोठेमोठे शोध देखील स्त्रिया लावत आहेत. अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची प्रतिभा तर डोळ्यासमोर आहेच. महिलांनी नवनिर्मिती कशी होते, त्यामध्ये कशी प्रगती झाली आहे, कशी पाहिजे आहे या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यास कित्येक पटीने समाज विकासाकडे झुकत जातो.
नवनिर्माण करणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व कुष्मांडा माता करते. या नवनिर्मितीचा सर्वानीच आदर केला पाहिजे. एखादे नवीन संशोधन ज्यामध्ये स्त्री एखादा नवीन आविष्कार जगासमोर मांडत असेल तर त्याला सर्वांनी दाद दिली पाहिजे त्याचे आचरण करून त्या नूतन गोष्टीस स्वीकारले पाहिजे.
जय कुष्मांडा माता
Comments
Post a Comment