ब्रह्मचारिणी : एका साधनेची कथा

ब्रह्मचारिणी  : एका साधनेची कथा

पवार अलोक अर्जुन अलका

सतीने हिमालयाकडे पुनर्जन्म घेतला होता. मात्र फक्त नवीन शरीर हा तिचा उद्देश नव्हता. तिला या जन्मातही भगवान शंकर यांना प्राप्त करायचे होते. यासाठी शैलपुत्री देवीने एक मोठी साधना करण्याचा निर्णय घेतला. ती ब्रम्हचारिणी झाली.ब्रम्ह म्हणजेच ही साधना, आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी. तिने पुढे बरीच वर्षे साधना केली. या संपूर्ण कालावधीत फक्त आणि फक्त फळांचे ग्रहण करून ती राहिली. तिची इतकी महत्वाकांक्षी साधना बघून सर्व देवांनी तिला वरदान दिले. तिला महादेवाची प्राप्ती हा तिच्या साधनेचा शेवटचा भाग होता.

आजकाल बऱ्याच महिला अवतीभोवती साधना करताना दिसतात. ही साधना कधीतरी शिक्षणाच्यासाठी असते, तर कधी स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी साधना सुरूच असते. या साधनेत बऱ्याच बाह्य अडचणी दिसून येतात. शिक्षण घेतल्याने प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडत असते. मात्र पितृसत्ताक समाजात बहुतांशी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जाते. शासकीय नियमानुसार ती जोपर्यंत १८ वर्षाची होत नाही तो पर्यंत तिला शिकवले जाते. साधारण बारावीपर्यंत किंवा पदवीच्या प्रथम वर्षापर्यंत ती शिकते. मात्र पुढे लग्नाच्या बेडीत अडकल्याने तिची ज्ञानसाधना कुठे तरी खंडित होत असते. पुढे जर ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पाहिले तर ती शंकराची अर्धांगिनी आहे. शंकराने आणि एकूणच पूर्ण ब्रह्मांडाने तिला महादेवी म्हणले आहे. मग सध्याच्या काळातल्या या मुली जर शिकल्याच नाहीत तर त्यांना पुढे यायची संधी भेटेल का हा एक मोठा प्रश्न पुढे येतो. 

पितृसत्ताक समाजातील या मुली पुढे याच पितृसत्ताक समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मग शिक्षण घेऊन पुढे करायचे काय, फक्त चूल आणि मुलं या फेऱ्यात तर अडकायचे आहे. मग कशाला पाहिजे शिक्षण. मग अशातच बऱ्याच उड्डाणाचे पंख काटले जातात. 

ब्रम्हचरिणी याच महिलांचे प्रतिनिधित्व करते. आपण सर्वांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा दाखविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त