वसुबारस
वसुबारस
भारत
हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतामध्ये जे सणवार साजरे केले जातात ते संपूर्ण
कृषीच्या धर्तीवर आधारित झाले आहेत. दिवाळी हा देखील त्यावर आधारलेला एक.
या
दिवाळीचा पहिला दिवा लागतो तो म्हणजे वसुबारस या दिवशी. हिंदू धर्माचा इतिहास पाहिल्यास देव आणि दानव यांच्यामध्ये
युद्ध चालू असताना जे समुद्रमंथन झाले त्यामधून पाच
गायी उत्पन्न झाल्या त्यामध्येच कामधेनू गाईसोबत नंदा नावाची गाय देखील उत्पन्न झाली. तिच्या साठीचे हा सण. हिंदू धर्मातील
बाळकृष्ण हा देखील गोकुळात वाढल्याची ख्याती आहे. कृष्णाचे आणि गाईंचे नाते हे
सर्वांना माहिती आहे. गाईच्या लोण्याच्या गोळा चोरून खाणारा देवकीनंदन कृष्ण आणि
त्याच चोरीतून देवकीमाईला संपूर्ण ब्रह्मांड
दाखविणाऱ्या बालकृष्णची गोष्ट सर्वांना माहिती असेलच.
गावाकडे बहुतांशी शेतकरी बांधवांकडे गोधन असते. शेतकऱ्यांना हे गोधन अतिशय महत्वाचे असते. कारण शेतासोबत दुग्धजन्य पदार्थांचा जोडधंदा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीस हातभार लावत असतो. ग्रामीण भागामध्ये हा दूध व्यवसाय हा गोवंश वाढवून अधिकाधिक बळकट कसा केला जाईल याकडे लक्ष दिले जाते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना नाबार्ड सारख्या योजनांच्या द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून हा गोवंश जपण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसते. मराठवाड्यामध्ये जिथे दुष्काळ पडतो तेथील सरकारी यंत्रणा या शेतकरी बांधवांकडील गाई - म्हशींना आणि एकंदरीत सर्व जनावरांना चारा आणि पाण्याचा अभाव होऊ नये यासाठी प्रत्येक गावामध्ये चारा छावणीच्या सोई केल्या जातात. गावाकडे अजूनही अत्याधुनिक पद्धतीने शेती म्हणजेच ट्रॅक्टर द्वारा मशागत होत नसल्याने तेथेही बैलांचा वापर पुष्कळदा शेतात केला जातो. बैल हादेखील या गोवंशातील एक प्राणी. त्यामुळे गोद्वादशीला गाईसोबत तिचे वासरू किंवा कालवड या दोघांची पूजा करून भारत देश हा गोवंशाने समृद्ध असल्याचे आपण जगाला दाखवून देतो आहे.
भारतामध्ये
अमूल - दुधसागर(गुजरात), नंदिनी(कर्नाटक), मदर डेअरी - साँची (मध्यप्रदेश), डायनामिक्स
(महाराष्ट्र), मिल्मा(केरळ) , आल्विन - मिल्की मिस्ट(तामिळनाडू), ओम्फेड
(ओरिसा), सुधा (बिहार) वर्का(पंजाब), हात्सन एग्रो (चेन्नई), हेरीटेज
(हैद्राबाद) अशा विविध नावाजलेल्या दुध उत्पादक कंपन्या विविध शेतकरी बांधवांना
दुधाच्या द्वारे रोजगार उपलब्ध करून देत आहेत. तसेच या दुधकंपन्यांमध्ये जे कामगार
काम करीत आहेत त्यांना देखील रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहेत. महाराष्ट्रात
देखील बऱ्याच दुध उत्पादक कंपनी आहेत ज्या सहकार तत्वावर चालतात.
गाईच्या दुधाला अनन्य साधारण महत्व आहे. ते औषधी मानले जाते. आयुर्वेदिक आणि आहार शास्त्रानुसार गाईच्या दुधाच्या सेवनामुळे बरेच फायदे होतात असे दिसून येतात. गाईचे कच्चे दूध पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. आजारांपासून वाचण्यासाठी हे शुद्ध दूध महत्वाचे कार्य करते. गाईच्या दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंक असल्यांने केसगळती थांबते. गाईच्या दुधातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे माणसाच्या मानसिक आजारांना दूर ठेवते. तर गाईच्या दुधाल कॅल्शियम ची मात्रा जास्त असल्याने हाडांना बळकटी येते. मेंदूच्या योग्य कार्यांसाठी गाईचे दूध अत्यंत महत्वाचे ठरते.
इतके
असूनही या गाईच्या दुधावर प्राथमिक हक्क हा फक्त आणि फक्त तिच्या वासराच्या आहे हे
विसरता कामा नये.
२०१४
मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या
युतीपक्षाने महाराष्ट्रात गोहत्या तसेच गोवंश म्हणजेच गाय, बैल, वळू आणि वासरे यांच्या हत्या
करण्यास बंदी आणली. त्यावेळी म्हैस देखील दुध उत्पादनासाठी पुढे आहे तर तिला या
कायद्यामध्ये काही तरतूद नाही किंवा अहिंदू लोकांकडून या कायद्याविरोधात बोलताना
दिसले. मात्र जर वन्य प्राण्यांची हत्या होऊ नये म्हणून सरकार काही पावले उचलत आहे
तर जे हिंदू गाईचे पालन करतात, धर्मानुसार तिला देव
देखील मानले गेले आहे तर तिची हत्या करून का द्यावी आणि हत्या करून तिला काही लोक
खात असतील तर ते कोणत्या अनुषंगाने योग्य आहे हे कळले पाहिजे. या बाबतीत जो कोणी
चुकीचे वागेल त्यास पाच वर्षे तुरुंग आणि दहा हजार रुपये शिक्षा हे अत्यंत
व्यवस्थित असा निर्णय वाटतो. कारण काही लोक ताटात जे जेवण पाहतात ते याच गोवंशातील
बैलाच्या मदतीने शेत नांगरून, मशागत करून पुन्हा
त्याच्याच सहाय्याने बाजारापर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ज्या हिंदू धर्मात आपण
निर्सगाचे देणे लागतो म्हणून काही सण साजरे करतो आहे त्यामध्ये वसुबारस हा सण
अतिशय महत्वाचा आहे.
या सणामध्ये गाईला आणि तिच्या वासराला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. इथे मात्र आपल्याला थोडा शास्त्रीय विचार करण्याची गरज आहे. पुरणपोळीमधील डाळीने गाय आणि वासराचे पोट तर बिघडणार नाही ना? त्यापेक्षा तिला तिला आवडणारे गवत, कडबा अशा गोष्टी चारल्या तर ती खुश होऊ शकते.
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार
एम.एस्सी. संगणक शास्त्र, एम.फील. (माहिती तंत्रज्ञान),
एमबीए. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. संप्रेषण भौतिक शास्त्र





नाइस वन
ReplyDeleteधन्यवाद योगेश
Delete