मार्गशीर्ष गुरुवार पुन्हा एकदा लक्ष्मीपूजन

 मार्गशीर्ष गुरुवार पुन्हा एकदा लक्ष्मीपूजन

दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन केले की पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजन केले जाते. लक्ष्मी पूजनाला कथा आहे मात्र ती पूजा किंवा लक्ष्मी कथेचा सार आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी वापरायची हे त्या वाचकाला कळले पाहिजे. 



गोष्टीची सुरवात ही आपल्याला द्वापार युगातल्या राजा राणीची गोष्ट सांगते. भद्रश्रवा आणि सुरातचंद्रिका हे राजा राणीचे कुटुंब. मागाच्या जन्मी कर्मदारिद्य लाभलेली राणी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करून यावेळी ती राणी झाली आहे मग तिने या जन्मी देखील लक्ष्मी ची पूजा केलीच पाहिजे हे सांगायला देवी वृद्ध महिलेचे रूप घेऊन राजदरबारात येते. हे ऐकून राणीच्या लेकीने म्हणजे श्यामबालेने आणि राणीने देखील लक्ष्मी पूजा व्रत केले. मात्र राणीने काहीच पूजा अर्चना न केल्याने तिला दारिद्र्य वास पुन्हा भोगावा लागला. राज्य गेले, दुसऱ्या देशाच्या हल्ल्यात राजा राणी देशोधडीला लागले. इकडे श्यामबाला मात्र धन्य झाली ती एका राजाची राणी झाली. तिचे सुख पाहून आणि तिची पूजा अर्चना पाहून राणीला मागच्या जन्मीच सर्व आठवल आणि आणि तिने मनोभावे पुन्हा पूजा सुरू केली. देवीची पूजा करून तिला तिचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले.

या संपूर्ण गोष्टींमध्ये देवी ही राणीच्या दरवाज्यामध्ये तिचे मूळ रूप बदलून एक वृद्ध स्त्री म्हणून आली होती. आणि पूजेची जर टॅग लाईन वाचली तर ती 'उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको' ही आहे. 

ही पूजा किंवा लक्ष्मीचे हे व्रत काय सांगते याकडे आपण शास्त्रीय दृष्ट्या बघणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या कडे आपण लक्ष्मीची तुलना पैसे किंवा त्या माध्यमातून प्राप्त झालेले वैभव याच्याशी करतो. मग पैसे कमविण्यासाठी जी व्यूहरचना किंवा मेहनत आपण एकदा करतो तिला कायमस्वरूपी टिकवणे महत्वाचे आहे. एकदा मेहनत करून प्राप्त झालेल्या पैशांचा पुढे भविष्यात वापर होईल तर ते चुकीचे आहे. पैसे कमविण्यासाठी वाममार्गाला लागणे हे देखील चुकीचे आहे. आपण ज्या गोष्टीतून किंवा जे काम करून पैसे कमावले त्यासाठी कसे कष्ट केले हे ते पैसे वापरताना लक्षात ठेवले पाहिजे. कमावत्या व्यक्तीने मग तो अगदी राजा असो राणी असो त्यांना पूर्वाश्रमीच्या कष्टांची जाणीव असणे हे फार महत्वाचे आहे. नाहीतर लक्ष्मी असंतुष्ट होण्यासाठी काडीमात्र वेळ लागत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी रूप बदलून म्हणजे वृद्ध महिला बनून राणीच्या दारी गेली होती. म्हणजेच आपली नीतिमत्ता तपासण्यासाठी आपल्या समोर कोण येईल हे सांगता येत नाही. काळ नेहमीच आपले परीक्षण करीत असतो. आपण या वेगवेगळ्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे असते. उगाच कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून आपण हातचे गमावले तर नुकसान आपलेच होते. काही लोक पैसे जास्ती कमावण्याच्या नादात लॉटरी काढतात. बार अशा लॉटरी ची नावे पण गमतीशीर बरं का. महालक्ष्मी, धनलक्ष्मी इ. म्हणजे ते लॉटरी चे तिकीट काढायचे आणि म्हणायचे लक्ष्मी देवी पाव ग. 

काही दिवसांपूर्वी काही पत्र घरी यायची लक्ष्मी चा हा मंत्र सात जणांना पाठवा पत्र लिहून पाठवा, त्या काळी पत्रांचा पण बराच खप व्हायचा. बरं सध्या अशी प्रलोभने व्हाट्सएपच्या माध्यमातून देखील फिरतात. हा मेतेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा म्हणजे नक्की लक्ष्मी प्रसन्न नाहीतर आयुष्यात वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीला घाबरून मेसेज फॉरवर्ड होतातही मात्र मोबाईल मधले एमबी म्हणजेच बॅलन्स कमी होत असतो तो चुकीच्या मार्गाने वाया जात असतो ते आपण रोखले पाहिजे. आपल्या कामातून आपण लक्ष्मी देवीला प्रसन्न करायचे असते. मार्गशीर्ष महिन्यातील देवीचे उद्यापन करण्यासाठी देवीच्या कथेचे पुस्तक आणि फळ इतर महिलांना देण्याची पद्धत आहे. फळ वैगरे वाटा हो, पण कथेची पुस्तके का, देवीच्या काळात पुस्तके वाटा अस काहीसं असेल का? हा आणि एकच प्रकारची पुस्तके, म्हणजे त्या पुस्तकांमध्ये काय इतके आहे की वाटली गेली पाहिजेत. पुस्तक विक्रेत्याच्या या प्रकारच खरंच कौतुक करायला हवे, की तो पुस्तक विक्री साठी इतका धडपडतोय. आणि लक्ष्मी प्राप्त करून घेतोय.

आता आणखीन एक मुद्दा येतो गुरुवारच्या दिवशीच पूजा का? देवीचा वार वैगरे सर्व ठीक आहे. मात्र देवीच्या गुरुवारच्या वार यावर आपण विचार करू. व्यावसायिक दृष्ट्या सोमवार ते शुक्रवार कामकाज चालते. सोमवारपासून बुधवार आपण काय कसे काम केले, यावरून काम करणाऱ्या व्यक्तीला आपण किती नफ्यात आहोत किती तोट्यात आहोत याची अनुभूती येते. आणि त्या दृष्टिकोनातून पुढचा एक दिवस महत्वाचा म्हणून गुरुवार हा पूजेचा दिवस. 

आता ही पूजा म्हणजेच कामातून श्रद्धा ठेवून पैसे कमविण्यासाठी फक्त मार्गशीर्ष महिना यावर माझा आक्षेप आहे. म्हणजे कामाबद्दल सर्व महिन्यात या लक्ष्मी मातेची सेवा करणे हे सर्व महिन्यात व्हायला पाहिजे. 

श्यामबाला हिच्या गोष्टीचा शेवट ती तिच्या माहेरून मीठ आणते. आणि तिच्या पतीला ते मीठ हे कसे सर्वश्रेष्ठ आहे, ते अळणी जेवणाला कसे चवदार बनवते, हे समजावून सांगते आणि त्यातून तिच्या माहेरची उदारता ती स्पष्ट करते. मिठाला आपण सार म्हणतो. हे सारच महत्वाचे. लक्ष्मीपूजनाच हे सारं आपल्याला कळले ना तर आपण लक्ष्मी ला नेहमीच प्रसन्न ठेवू शकतो. 


प्रा. अलोक अर्जुन पवार

Comments

  1. छान आहे सर✌️👌

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लिहिले आहे.

    ReplyDelete
  3. महत्त्वाचे मुद्दे अगदी छान थोडक्यात स्पष्ट केले आहेत.देवावर कायमच मनोभावे श्रद्धा असावी.श्रीमंती आली किंवा पैसा आला तर परमेश्वराला कधी विसरु नये.त्यात पूर्वीचे गरिबीचे दिवस कधीच विसरु नये....खूपच छान माहिती आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मी परमेश्वर आपल्या कामात बघावे हे स्पष्टीकरण दिले आहे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त