हरितालिका

हरितालिका
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका

ही गोष्ट आहे एका प्रेमाची. ही गोष्ट आहे एका प्रेम विजयाची. अशा प्रेमाची जिथे एखाद्यावर मनापासून प्रेम केले तिथे त्याचे मन जिंकण्याची धमक दाखवली गेली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती धमक एका स्त्री कडून दाखविण्यात आली. 


गोष्ट सुरू करण्याच्या आधी आपण सध्याच्या प्रेमी युगुलांचा विचार कसा सुरू आहे प्रेमात पडल्यावरच्या भावना किंवा एक सोडला की दुसरा मग तिसरा या कल्पना इथे सहज रुजतात आणि हर जनम साथ तेरा मेरा उडन छु होते. याच धर्ती वर ही हरतालिका मातेची कथा.
हिमालय पर्वताची कन्या म्हणजे देवी पार्वती मोठी झाली होती. आपली मुलगी मोठी झाली की प्रत्येक पिता तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरवात करतो जेणेकरून लग्न करून तिला सासरी पाठवले की तो पिता कर्तव्यमुक्त होतो.
पार्वती उपवर झाली होती. हिमालयाच्या मनात योग्य वर कोण हा विचार आल्यावर भगवान विष्णू हे पार्वतीसाठी वर असावेत ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र पार्वतीने हे असे कोणतेही विचार ऐकण्याच्या आधीच महादेवांना बघता क्षणी वरण्याची इच्छा मनात आणली होती. त्यामुळे कितीही उत्कृष्ट वर तिच्यासमोर आणला तरीही तिचे मन महादेवावर भाळले होते. 
वडिलांची लग्नाबद्दल भूमिका पाहून पार्वती मनातून अतिशय विचलित झाली होती. तिचे मन सैरवेर झाले होते. विष्णुसोबत विवाह तिला अजिबातच मंजूर नव्हता. तिने आपल्या वडिलांकडे आपल्या मैत्रिणींमार्फत निरोप पाठवला की मला हा विवाह मंजूर नाही. जर या विवाहाबाबत विचार झाला तर मी देहत्याग करेल. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या पित्याचे घर सोडण्याचा निश्चय केला. मैत्रिणींच्या मदतीने तिने घर सोडले. पुढे तिने तब्बल १२ वर्षे भगवान शिवशंकरची तपश्चर्या केली. तिने अरण्यात जाऊन वाळूची पिंड बनवून यथायोग्य पूजा केली. कोणत्याही मोहाची अपेक्षा नसलेले भगवान शंकर पार्वतीच्या या प्रेमरूपी व्यक्तित्वाकडे आकर्षित झाले. त्यांनी त्या प्रेमाचा स्वीकार केला आणि ही होती थोडक्यात जगातील पहिल्या प्रेमविवाहाची गोष्ट. पार्वती ही हिमालयातील राजाची कन्या होती तर महादेव - शंकर हे स्मशानात राहणारे विरक्त पुरुष. दोघांच्या राहणीमानात फरक होता मात्र तरीही पार्वतीने सर्व गोष्टी स्वीकारल्या होत्या. पार्वतीने तिच्या दिव्य दृष्टिकोनातून महादेव आणि एकूणच त्यांच्या राहणीमानाचा स्वीकार केला. पार्वतीलाच अन्नपूर्णाही म्हणतात. महादेवाच्या गणाला देखील आपल्या परिवारात तिने सहभागी केले होते.


हरितालिका मधील हरिता या शब्दाचा अर्थ होतो की जिला नेले ती, आणि आलि म्हणजे मैत्रीण, म्हणजेच शिवप्राप्तीसाठी जिला मैत्रिणींनी नेले ती हरितालिका. 
आजकाल प्रेम हे अगदी महाविद्यालयीन वयात होते. या वयातच स्त्री पुरुष आकर्षण वाटू लागते. प्रेम करणे किंवा एखाद्या मुला किंवा एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटणे गैर नाही पण जर आपण या कथेचा विचार केला तर आपल्याला आपल्या वडिलांना सत्य सांगण्याची धमक असली पाहिजे नुसते समोरच्याला स्वीकारून नाही तर त्याच्या सोबत आणि फक्त त्यांच्यासोबतच आयुष्य व्यक्तीत होऊ शकते यासाठी बारा वर्षाच्या त्यागाची देखील तयारी असणे गरजेचे आहे. पार्वतीने महादेवांवर प्रेम केले होते यात कोणत्याही प्रकारची जवाबदारी नव्हती. पार्वतीचे प्रेम हे गरीब श्रीमंतीला अधीन राहून नव्हते.
म्हणूनच त्या हरितालिका मातेची पूजा आज भक्ती भावाने केली जाते. कुमारिकांना आपल्याला चांगला उपवर प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत केले जाते. हरितालिकेची मूर्ती आणि तिच्या समोर वाळूची पिंड हा या पूजेत असलेला महत्वाचा भाग.
हिंदू धर्मातील सण हे निसर्गातील सत्य डोळ्यासमोर उघडे ठेवण्यासाठी समोर येतात. प्रेम हा याच निसर्गातील एक मोठा विचार. त्या प्रेम प्राप्तीसाठीचा हा सण.
हरितालिका माता की जय.
सर्वांना या सणाच्या शुभेच्छा!

Comments

  1. खूप छान माहिती दिलीतअलोक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त