काळरात्री देवी : असुरांचा काळ
काळरात्री देवी असुरांचा काळ
डॉ. अलोक पवार
देवांच्या कृपेने बरेच राक्षस पृथ्वीवर आपली प्रबळ शक्ती वापरून बरीच नासधूस करायचे. साधूसंत, लोकांना मारायचे. मी देवांच्या कृपेनें या करिता बोललो कारण हे राक्षस तपश्चर्या करायचे आणि देवांना वरदान मागायचे मग काय त्यांना तो देव पण त्यांना काही करू शकणार नाही असे प्रबळ वरदान त्यांच्या कडे असायचे. असाच एक दानव आधीच्या काळी होता तो म्हणजे रक्तबीज.
रक्तबीजला वरदान होते की त्याच्या रक्ताचा अंश जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा अजून एक दानव उत्पन्न होत होता. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही देवाला त्याच्याशी युद्ध करणे अशक्य होते. हे युद्ध कोणत्याही अस्त्राने देखील शक्य नव्हते. रक्तबीजाचे रक्त सांडून बरेच दानव उत्पन्न झाले होते. सगळे देव निराश होऊन भगवान शिवाकडे गेले. माता पार्वती तिथेच होती. तीने स्वतःपासून काळरात्री निर्माण केली. काळरात्री देव काळी या एकच देव्या. त्या कालीचे रूप हे दैत्यांसाठी कर्दनकाळचं होते. ती रक्तबीजाची मुंडी छाटून लगेचच ते रक्त प्राशन करायची. त्यामुळे नवीन असूर उत्पत्ती व्हायचीच नाही. रक्तबीजाचे रक्त पिऊन मातेच स्वरूप उग्र झाले होते. ती अतिशय क्रोधित झाली होती. ती त्या रात्रीचा कर्दनकाळ झाली होती.
जेंव्हा जेंव्हा धर्तीवर अशा प्रकारचा कहर होतो आणि स्त्री स्वतः मैदानात उतरते तेंव्हा ती खरंच काळरात्री बनते. आज स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. त्या अत्याचारांवर रोख घालण्यासाठी प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी काळरात्री बनायचे आहे. स्वयं रक्षा करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. आणि जर ती सज्ज नाही झाली तर ती अबला आहे ती काय करणार. चला आपणही तिच्यावर तसा अत्याचार करू यासाठी तसाच दुसरा अत्याचारी निष्पन्न होईल. या कलयुगातला रक्तबीज तयार होईल. काळरात्री या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते ज्यांना खरंच अशा पापाचा विनाश करायचा आहे.
जय मा काळरात्री

Comments
Post a Comment